

Akola News
esakal
अकोला: शहरातील वाढत्या घनकचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवून स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी अकोला महानगरपालिकेने विविध घटकांसाठी नवीन उपयोगकर्ता शुल्क जाहीर केले आहे. घरगुती वापरकर्ते, दुकाने, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, मॉल्स आणि चित्रपटगृहे यांच्यासाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले असून आता नियमित कचरा संकलन सेवेसाठी नागरिकांना शुल्क भरावे लागणार आहे.