
अकोला : आवश्यक सेवांसह इतर नागरी सुविधा पुरवताना महापालिकेची तिजोरी रिकामी होत असून, प्रशासनाला मोठी आर्थिक कसरत करावी लागत आहे. अत्यावश्यक सेवा आणि सुविधांवर दरमहा लाखोंचा खर्च होत असून, तो भागवताना महापालिकेच्या तिजोरीवर ताण वाढत आहे. त्यामुळे पाणीपट्टी व मालमत्ता कर नियमित भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.