
अकोला : रामनगर परिसरातील अनधिकृत वाढीव बांधकामांविरोधात महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.३) मोठी कारवाई केली. मंजूर नकाशाच्या अटींचा भंग करत उभारण्यात आलेली चार मजली इमारत आणि खासगी रुग्णालयासमोरील अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले.