राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, कंटेनरने दिली कारला धडक, चार जण जागीच ठार

प्रा.अविनाश बेलाडकर 
Monday, 20 July 2020

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नागठाणा फाट्याजवळ आज दुपारी कंटेनरने कारला समोरासमोर जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले.

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नागठाणा फाट्याजवळ आज दुपारी कंटेनरने कारला समोरासमोर जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले.

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या होंडा सिटी कार (एमएच ०४ बीडब्ल्यू ५२५९) ला अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच १५ एफव्ही १४१३) ने जबर धडक दिली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

धडक एवढी जबर होती की कारमधील सर्व जण बाहेर फेकल्या गेले. कारचा समोरील भाग चकनाचूर झाला. नवरा, बायको व त्यांची दोन चिमुकली घटनास्थळीच ठार झाले. हुसेन गुलाम हुसेन(५०), साबीया हुसेन हबीब(३०)आणि हुसेन हबीब मो.हबीब(३५) हे तीन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना येथील लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले व अत्यवस्थ असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्याला पाठविण्यात आले.

(संपादन -  विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola murtizapur accident on national highway, container hit car, killing four people on the spot