अकोला : अलौकिक बुद्धिमत्ता अन् मधूर आवाजाचीही ‘वैदिशा’ला देण

वयाच्या अडीच वर्षात देशांच्या राजधान्या तोंडपाठ अन् चवथ्या वर्षी संगीत क्षेत्रात जादू
Akola vidisha sherekar name in india book of records
Akola vidisha sherekar name in india book of records

अकोला : जगातील सर्व देशांच्या राजधान्या व त्यांचे राष्ट्रध्वज अचूक ओळखण्याचा विक्रम अकोल्यातील वैदिशा शेरेकर हिने वयाच्या अडीच वर्षातच केला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थांनी सुद्धा तिच्या नावाची दखल घेतली. यामुळे तिच्या अलौकिक बुद्धीमत्तेची जाण सर्वत्र असून, आता वयाच्या चवथ्या वर्षी तिने संगीत क्षेत्रातही जादू दाखवित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची परीक्षा प्रथम क्षेणीत उत्तीर्ण केली आहे.

वैदिशाचे वडील वैभव ज्ञानेश्वर शेरेकर हे अकोला येथे बँक ऑफ इंडियामध्ये प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. आई दिपाली शेरेकर या गृहिणी आहेत. वैदिशाचा आवाज मधूर असल्याची जाणीव व ती मोठमोठे गीत तसेच मोठमोठ्या कथा सहज लक्षात ठेवू शकते याची कल्पना तिच्या आई-वडिलांना होती. त्यातूनच तिला गायनाच्या क्षेत्रात उतरवण्याचा त्यांनी निर्णय घेतला व संगीत क्लास लावावा म्हणून एका संगीत क्लासमध्ये तिला नेले.

संचालिकेने वैदिशाची गायनाची पद्धत, तिचे उच्चार व आवाज ऐकला व परीक्षा देण्याविषयी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई ठरवतील ही अट मान्य करून तिचा प्रवेश निश्चित केला. वैदिशा पावणेचार वर्षाचीच असल्याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांनी वैदीशाच्या वडिलांना तिला दोन ते तीन वर्षानंतर परीक्षेला बसवण्यास सूचवले व फॉर्म रिजेक्ट करण्याबाबत सांगितले. मात्र, वडिलांनी तिच्या असाधारण बुद्धिमत्तेची कल्पना व तिच्या दैदिप्यमान कामगिरीबाबत त्यांना सांगून तिची परीक्षा घेण्यास विनंती केली.

तिच्या कामगिरीबद्दल ऐकून मंडळाने तिला परीक्षा देण्यास सहमती दर्शवली. सत्राच्या शेवटी मुंबई येथील चमूने परीक्षा घेतली असता, वैदिशाने प्रथम श्रेणीत परीक्षा पास केली. त्यामुळे तिला अलौकिक बुद्धीमत्तेसोतच मधूर आवाजाचीही देण मिळाल्याचे सिद्ध झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com