नीट, जेईई रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शने

विवेक मेतकर
Saturday, 29 August 2020

कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे नीट, जेईई नियोजित तारखांना न घेता पुढे ढकण्यात याव्यात, या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.२८) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

अकोला :  कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे नीट, जेईई नियोजित तारखांना न घेता पुढे ढकण्यात याव्यात, या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.२८) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य जपणे, संसर्गापासून नागरिकांचे संरक्षण करणे केंद्र सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र कोविड-१९ च्या संसर्गातही केंद्र सरकार संपूर्ण देशात नीट, जेईई घेण्याचा आग्रह पकडत आहे. संसर्गामुळे विपरित परिस्थिती असताना विद्यार्थ्यांवर परीक्षा लादणे योग्य नाही.

त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे नीट, जेईई रद्द करण्याची मागणी करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, कार्याध्यक्ष सुनीप पाटील धाबेकर यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना परीक्षा नियोजित वेळेत न घेता पुढे ढकलण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

यावेळी मनपाचे विरोधी पक्ष नेते साजित खान पठाण, प्रकाश तायडे, प्रमोद डोंगरे, प्रशांत गावंडे, उदय देशमुख, प्रदीप वखारिया, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, राजेश राऊत, जि.प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, दिनेश दुबे, अकोला महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

या केल्यात मागण्या

  • नीट, जेईई परीक्षा घेतल्यास विद्यार्थी व पालक यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
  • लाखो परीक्षार्थी व पालक यांचा या भयानक महामारी प्रसंगी जेईई, नीईट घेण्यास विरोध आहे.
  • आसाम, बिहार, मणीपूर अशा अनेक राज्यात पुरपरिस्थितीमुळे तेथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
  • या भागातील विद्यार्थांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचणे फारच अवघड आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थीया महत्त्वपूर्ण परीक्षेपासून वंचित राहू शकण्याची दाट शक्यता आहे.
  • कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच भीती असल्याने त्यांची मानसिक स्थिती गोंधळेली आहे.
  • कोविड-१९ महामारीमुळे अनेक राज्यात वाहतूक व्यवस्था व राहण्याची व्यवस्था विस्कळीत झालेली आहे.
  •  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Congress protests for cancellation of neet and JEE