esakal | १६ हजार कृषिपंप ग्राहक थकबाकी मुक्तीकडे
sakal

बोलून बातमी शोधा

akola news 16,000 agricultural pump customers to get rid of arrears

महा कृषी ऊर्जा अभियान २०२० च्या माध्यमातून महावितरणच्या अकोला परिमंडला अंतर्गत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील १५ हजार ९७८ कृषी ग्राहकांनी ११ कोटी ३६ लाख रुपये थकित बिलाचा भरणा केल्याने त्यांची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे झाली आहे.

१६ हजार कृषिपंप ग्राहक थकबाकी मुक्तीकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः महा कृषी ऊर्जा अभियान २०२० च्या माध्यमातून महावितरणच्या अकोला परिमंडला अंतर्गत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील १५ हजार ९७८ कृषी ग्राहकांनी ११ कोटी ३६ लाख रुपये थकित बिलाचा भरणा केल्याने त्यांची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे झाली आहे.
अकोला परिमंडलातील दोन लाख ९३ हजार ४२८ कृषिपंप ग्राहकांना महावितरण कृषी वीज जोडणी धोरण - २०२० नुसार वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत दोन हजार ७७२ कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. कृषिपंपाच्या नवीन वीज जोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून जाहीर झाले आहे. या धोरणानुसार अकोला परिमंडळातील १५ हजार ९७८ कृषिपंप ग्राहकांनी ११ कोटी ३६ लाख रुपयांचा भरणा करत थकबाकी मुक्त झाले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील २९८१ कृषिपंप ग्राहकांनी दोन कोटी ९५ लाख, बुलडाणा जिल्ह्यातील ५३४५ कृषिपंप ग्राहकांनी चार कोटी ९९ लाख रुपयांचा तर वाशीम जिल्ह्यातील ७६५२ ग्राहकांनी तीन कोटी ४२ लाख रुपये थकबाकीचा भरणा केला आहे.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात
..........
व्याज माफीचा लाभ
महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. पाच वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.
..................................................
शेतकऱ्यांशी थेट संवाद
शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्तीची संधी तसेच वसूल झालेल्या बिलातील ३३ टक्के रक्कम ही संबंधित ग्रामपंचायत व ३३ टक्के रक्कम ही जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार असल्याने महावितरणतर्फे जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांशी थेट संवाद साधून अभियानाची माहिती दिली जात आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image