१७० अहवाल प्राप्त, आणखी चार बळी, ३३ नवे पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 14 October 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून मंगळवारी (ता. १३) कोरोना संसर्ग तपासणीचे १७० अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३७ अहवाल निगेटिव्ह तर ३३ अहवाल पॉझिटीव्ह आले. याव्यतिरीक्त चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अकोला  ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून मंगळवारी (ता. १३) कोरोना संसर्ग तपासणीचे १७० अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३७ अहवाल निगेटिव्ह तर ३३ अहवाल पॉझिटीव्ह आले. याव्यतिरीक्त चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी आढळत आहेत. परंतु कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनामुळे मंगळवारी (ता. १३) चार रुग्णांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णांपैकी पहिला रुग्ण खडकी खदान येथील ६४ वर्षीय पुरुष होता. त्याला १२ ऑक्टोंबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू सिव्हील लाईन येथील ३० वर्षीय महिलेचा झाला. तिला ५ ऑक्टोंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू बार्शीटाकळी येथील ५६ वर्षीय पुरुषाचा झाला.

त्याला ९ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. चौथा मृत्यू कापशी ता. पातूर येथील ५४ वर्षीय पुरुषाचा झाला. त्याला १० ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी (ता. १३) दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून चार, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन, तर हॉटेल रिजेन्सी येथून एकाला अशा एकूण ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ३७९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोना तपासणीचे मंगळवारी (ता. १३) दिवसभरात ३३ अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. संबंधित रुग्ण रामदासपेठ येथील तीन तर उर्वरित मोठी उमरी, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जिल्हा परिषद कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. मंगळवारी सायंकाळी २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील माना, मोठी उमरी व अधिकारी निवास सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन जण, मूर्तिजापूर व शिवर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, जउळका, तेल्हारा, सावरगाव, शिर्ला, फडके नगर, देवराव बाबा चाळ, लहान उमरी, गिता नगर, वृंदावन नगर, तळेगाव बाजार व हिरवखेड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे

कोरोना मीटर
- एकूण पाॅझिटिव्ह - ७८६६
- मृत - २६०
- डिस्चार्ज - ७२२७
- अॅक्टिव्ह रुग्ण - ३७९

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 170 reports received, four more victims, 33 new positive