esakal | बारावीचे ६७२ तर दहावीचे ५१८ विद्यार्थी देणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: 672 students of class XII and 518 students of class X will appear for the exam

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेला शुक्रवार (ता. २०) पासून सुरूवात होणार आहे. पुरवणी परीक्षांसाठी जिल्ह्यात आठ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

बारावीचे ६७२ तर दहावीचे ५१८ विद्यार्थी देणार परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेला शुक्रवार (ता. २०) पासून सुरूवात होणार आहे. पुरवणी परीक्षांसाठी जिल्ह्यात आठ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यात बारावीचे ६७२ तर इयत्ता दहावीचे ५१८ विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. तेथे त्यांची थर्मल गन व पल्स ऑक्सिमिटरच्या सहाय्याने चाचणी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.

असे आहेत परीक्षा केंद्र
- शहाबाबू उर्दू कॉलेज, सिताबाई ज्युनिअर कॉलेज, श्री शिवाजी महाविद्यालय अकोट, एस.बी. कॉलेज तेल्हारा, श्रीमती धनाबाई कनिष्ठ महाविद्यालय बाळापूर इत्यादी परीक्षा केंद्रांवर इयत्ता १२ वीची परीक्षा होणार आहे.
- मुंगिलाल बाजोरिया कॉन्व्हेंट स्कूल अकोला, नरसिंग विद्यालय अकोट, अंजुमन उर्दू हायस्कूल बाळापूर इत्यादी परीक्षा केंद्रांवर इयत्ता १०वी ची परीक्षा होणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)