अमरावती विभागात ७० हजार विद्यार्थी देणार अंतिम वर्षाची परीक्षा

मनोज भिवगडे
Wednesday, 9 September 2020

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम या पाच जिल्ह्यांतर्गत अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रांच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार आहे. ही परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार असून, जेथे व्यवस्था नाही, तेथे ऑफलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात ले आहे.

अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम या पाच जिल्ह्यांतर्गत अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रांच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार आहे. ही परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार असून, जेथे व्यवस्था नाही, तेथे ऑफलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात ले आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी-२०२० ची परीक्षा, अंतिम सत्राच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

प्रत्येक युनिटवर १० प्रश्न अशा ६० प्रश्नापैकी विद्यार्थ्यांना ३० प्रश्न ऑनलाईन पद्धतीने शिकत असलेल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटांचा राहील. या विद्यार्थ्यांना असलेल्या अनुशेषाच्या परीक्षासुद्धा याच पद्धतीने घेण्यात येतील. याशिवाय इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा उन्हाळी-२०२० परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग करून त्या प्रश्नपत्रिकेतील कोणतेही तीन प्रश्न विद्यार्थ्यांना दोन तासात सोडवून पूर्ण करायचे आहेत.

सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी प्रवेशित असलेले महाविद्यालय हे त्यांना परीक्षा केंद्र असतील. अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम वगळून इतर अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष, अंतिम सत्रांच्या विद्यार्थ्यांना असलेल्या अनुशेष सत्रांच्या परीक्षा विद्यापीठाकडे उन्हाळी-२०२० परीक्षेसाठी तयार असलेल्या प्रश्नपत्रिका एका सत्राच्या रोज तीन प्रश्नपत्रिका व प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील कोणतेही दोन प्रश्न सोडवन तीन तासात तीन विषयाची परीक्षा पूर्ण करण्यात येईल. तीन विषयाच्या तीन उत्तरपत्रिका सोडविण्यास विद्यार्थ्यांना देण्यात येतील.

या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र हे विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालय राहील. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशित महाविद्यालयात परीक्षा देणे अपरिहार्य कारणास्तव शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांनी विनंती केल्यास त्यांचे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सोईच्या संलग्नित महाविद्यालयात,परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात येईल. प्रात्याक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत महाविद्यालयांना घ्यावयाच्या आहेत. उपरोक्त परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.

बहिशाःला विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र
अंतिम वर्ष, अंतिम सत्राचे बहिशा:ल विद्यार्थ्यांना त्यांना जवळ असलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल. अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र विद्यापीठाद्वारे निश्चित करण्यात येवून प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा उल्लेख करण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्याकरिता यापूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच अतिरीक्त वेळ देण्यात येईल.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 70,000 students will take final year exams in Amravati division