दारूड्या नातवाने केला ९० वर्षीय आजीचा खून

भगवान वानखेडे
Friday, 4 September 2020

दारू पिण्यास पैसे देत नाही, या कारणावरून दारूड्या नातवाने आजीच्या गळ्यावर विळ्याने वार करत खून केल्याची घटना तालुक्यातील खुरमपुर येथे गुरुवारी (ता.३) उघडीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नातवास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

लोणार (जि.बुलडाणा) : दारू पिण्यास पैसे देत नाही, या कारणावरून दारूड्या नातवाने आजीच्या गळ्यावर विळ्याने वार करत खून केल्याची घटना तालुक्यातील खुरमपुर येथे गुरुवारी (ता.३) उघडीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नातवास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील खुरमपूर येथील माजी सैनिक पत्नी मृतक लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे (वय ९०) हिचा दारूड्या नातू नामदेव भावराव नागरे (वय ४०) याने दारू पिण्यास पैसे न दिल्याने हातात विळा घेत त्याच्या आजीच्या गळ्यावर सपासप वार करत ठार केले. ही बाब सरपंचपती समाधान राठोड यांना समजताच त्यांनी याबाबत लोणार पोलिसांना माहिती दिली.

अकोला जिल्ह्याील बातम्यांसाठी क्लिक करा

माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अजहर शेख, पोहेकॉं सूरेश काळे, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, पोहेकॉ बन्सी पवार , गोपनिय विभगाचे कैलास चतरकर, पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र बोरे, चालक गजानन ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पंचनामा केला व नातू नामदेव नागरे हा पळून जाण्याचा तयारीत असताना गावकऱ्यांच्या मदतीने मोठया शिताफितीने अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

युवतीचा विनयभंग, गुन्हा दाखल
अकोला शहरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात मैत्रिणीसोबत सायकलची चाबी देण्याकरिता गेलेल्या १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहान उमरी परिसरातील १९ वर्षीय युवती बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात मैत्रिणीसोबत सायकलची चावी देण्याकरता गेली. या दरम्यान आरोपी कुशल अहिर (वय २५) याने तुझ्यासोबत बोलायचे आहे, म्हणून जबरदस्ती बोलणे सुरू केले. अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली असता मुलीने सुटका करून घेतली. मात्र, आरोपीने पाठलाग करून अश्लील हावभाव करत धमकी दिली. याप्रकरणी तक्रार देऊन सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी एएसआय जांभुळे हे अधिक तपास करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 90-year-old grandmother murdered by drunken grandson