आधी कुऱ्हाडीने हल्ला केला, मग दारू टाकून पेटवून केली हत्या, न्यायालयाने आरोपीला सुनावली ही शिक्षा

श्रीकृष्ण लखाडे
Wednesday, 16 September 2020

 पातुर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला केल्यानंतर गावठी दारूने पेटवून हत्या केल्या प्रकरणी आरोपी विकास राठोड याला चान्नी पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे हजर केले.

चतारी (जि.अकोला) :  पातुर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला केल्यानंतर गावठी दारूने पेटवून हत्या केल्या प्रकरणी आरोपी विकास राठोड याला चान्नी पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे हजर केले.

यावेळी न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ कारणावरून राजाराम तुकाराम हिवराळे याच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून जाळून हत्या केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी झाली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आरोपी विकास बाबूसिंग राठोड व मृतक राजाराम हिवराळे दोघे एका शेत मालकाच्या शेतात मजुरी करीत होते. किरकोळ कारणावरून आरोपी विकास राठोड यांने राजाराम हिवराळे यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला होता.

त्यानंतर दारूने पेटवून दिल्यावर गंभीर अवस्थेमध्ये हिवराळे याला जवळील नाल्याच्या काठावर टाकून दिले होते. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात आदिनाथ गाठेकर, पद्माकर पातोंड, किरण गवई, रावसाहेब बुधवंत, सुधाकर करवते, खत्री, संतोष जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गंभीर झालेल्या राजाराम हिवराळे याला अकोला येथे उपचारासाठी हलविले होते. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीस अटक केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Accused attacked with ax, set on fire with alcohol, court remanded accused