औषधे नदीत फेकली, आता होणार कारवाई

धर्मेश चौधरी
Wednesday, 16 September 2020

गोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडतो आहे.   

तळेगाव बाजार (जि.अकोला)  :  घरात कोणी वारंवार आजारी पडत असेल किंवा त्याला वारंवार ताप येत असेल तर त्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. 

पण, गोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडतो आहे.   

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील आरोग्य केंद्रात आलेले औषध गरीब रुग्णला वाटप न करताच नदीत फेकल्यामुळे गावात संताप व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हिवरखेड आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथे गत काही महिन्यापासून तापिचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य उपकेंद्रामध्ये रुग्णांना वाटप करण्यासाठी आलेले औषध, गोळ्या, खोकला, तापाची औषधे मुदत संपली म्हणून येथीलच विदृपा नदीत फेकून देण्यात आली.

या घटनेची दखल पंचायत समितीच्या उपसभापती प्रतिभा इंगळे व जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी घेतली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा रेटून धरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हिवरखेड आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथे गत काही महिन्यांपासून तापिचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य उपकेंद्रामध्ये रुग्णांना वाटप करण्यासाठी आलेले औषध, गोळ्या, खोकला, तापाची औषधे मुदत संपली म्हणून येथीलच विदृपा नदीत फेकून देण्यात आले होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Action will be taken in the case of throwing medicine in the river