आयटकचे महानगरपालिकेपुढे आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 15 October 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेसाठी ज्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना त्यांचे कुटुंबीय परवाणगी देत नसतील, त्यांना या योजनेत काम करण्याची सक्ती करू नये,

अकोला : राज्यातील ७० हजार आशा स्वयंसेविका व ३५०० गट प्रवर्तकांना सुधारित वेतनश्रेणी चालू करून १८००० रुपये किमान वेतन मिळावे, आशा व गटप्रवर्तक यांना कामवाढ व ताणवाढ करून सतत त्रास देणार्या अधिकार्यांना तातडीने बडतर्प करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक)च्या वतीने महानगरपालीकेसमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेसाठी ज्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना त्यांचे कुटुंबीय परवाणगी देत नसतील, त्यांना या योजनेत काम करण्याची सक्ती करू नये,

या मोहीमेत काम करणार्या आशा स्वयंसेविकांना ३०० रुपये अतिरिक्त मानधन देण्यात यावे, या राज्यपातळीवरील मागण्यांसह स्थानिक पातळीवरील कुष्ठरोग, टीबी, मातृवंदन, अपंग सर्वेक्षणचा मोबदाला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: agitation in front of the corporation