आंबेडकरांचा मास्टरस्ट्रोक : एकाच आंदोलननाने शिवसेना आणि भाजप दोन्ही बाजूला

विवेक मेतकर
Wednesday, 2 September 2020

प्रकाश आंबेडकरांना राज्य शासनाने दहा दिवसांची मुदत मागितली आहे. या दहा दिवसांत सरकारकडून नियमावली तयार झाली नाही, तर वंचित बहूजन आघाडी पुन्हा पंढरपूरात आल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही ॲड.आंबेडकर यांनी दिला होता. मात्र, याकाळातच इम्तियाज जलील यांनी हाच मुद्दा हातात घेतला आहे.  

अकोला : सरकारकडून रेल्वे, मेट्रो आणि बसेस सुरू केल्या जातात मग मंदिरं का सुरू केली जात नाहीत?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व्यवस्थेला विचारत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरातील  विठूरायाचे दर्शन घेतले. मात्र असे असले तरी व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी अनेक राजकीय मंडळी समोर येत आहे. ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्यापाठोपाठ आता औरंगाबाद येथील खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मंदीर आणि इतर धार्मिक स्थळांच्या प्रवेशाबाबत मंगळवारी आंदोलन करत आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांना राज्य शासनाने दहा दिवसांची मुदत मागितली आहे. या दहा दिवसांत सरकारकडून नियमावली तयार झाली नाही, तर वंचित बहूजन आघाडी पुन्हा पंढरपूरात आल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही ॲड.आंबेडकर यांनी दिला होता. मात्र, याकाळातच इम्तियाज जलील यांनी हाच मुद्दा हातात घेतला आहे.  

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हे आंदोलन करताना शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना ‘तुम्ही मंदीराबाबत बोलताना तुमचा काय संबंध’ असा सवाल केला असता ‘आमच्या हिंदू बांधवांच्या मागणीनुसार त्यांना साथ देण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे. उद्या आम्ही नमाज पठण करणार आहोत. मंदीर, मश्‍जिद आणि गुरुद्वारा सुध्दा भाविकांसाठी खुले करण्यात यावेत. काही राजकीय पक्षांना एमआयएम मंदीराविषयी का बोलतेय तर काही नेत्यांचे चुकीचे वक्तव्य समोर येत आहेत. मात्र, आम्ही एका चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला आहे. तर आमच्याकडून शक्य ते प्रयत्न होतीलच. पोलिसांवर ताण येऊ नये म्हणून आम्ही विशेष लक्ष देत आहोत, असे इम्तियाज जलिल म्हणाले. 

आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना मंदीराच्या मागे पूजेचे साहित्य, फुल नारळ विकणाऱ्यांवर या बंदीचा विपरीत परीणाम होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे आमचे लक्ष नसून लोकप्रतिनिधी म्हणून धार्मिक स्थळांसाठी आम्ही पुढाराकर घेतला आहे. औरंगाबाद येथील जनतेला त्यांनी खडकेश्‍वर मंदीराचे आंदोलन मागे घेत असल्याचे इम्तियाज जलिल यांनी एका व्हिडिओमार्फत कळविले आहे.

मुद्दा हिंदूत्वाचा
पंढरपूर- कपाळास बुक्का, चंदन लावून अ‍ॅड. आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. अ‍ॅड. आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल, असं राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

औरंगाबाद- काल या प्रकरणावरुन औरंगाबादचे राजकारण प्रचंड तापले होते. औरंगाबाद मध्ये एमआयएम खासदार ईम्तीयाज जलील यांनी शहरातील मंदीरं उघडण्याची मागणी करत आंदोलन करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी औरंगाबादमधील खडकेश्वर परिसरातील महादेव मंदीरात मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपल्या समर्थकांसह गर्दी केली असता तेव्हा शिवसेचे आमदार अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही या आंदोलनात उडी घेत जलीलांचा विरोध केला.

Video : दार उघड देवा, आता दार उघड!, मंदिर उघडण्यासाठी भाजपचा घंटानाद |  eSakal
भाजपचा घंटानाद शमला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच भाजपने काही दिवसांपूर्वी घंटानाद केला होता. मात्र, हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय हे जनता स्पष्टपणे ओळखू शकते. भाजपाच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई मंदिर उघडण्याचे आंदोलन  आणि तिकडे संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार जलील यांनी मशिदीची टाळी उघडण्याच्याच्या घोषणेत भाजपच्या घंटानादाचा प्रतिध्वनी उमटलाच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Ambedkars masterstroke: Pandharpur agitation on both sides of Shiv Sena and BJP