esakal | अमरावती शिक्षक मतदारसंंघ; राजकीय पक्ष,अपक्ष उमेदवारांची रस्सीखेच
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Amravati Teachers Constituency; Political parties, the ropes of independent candidates

राज्यातील पाच विधानपरिषद निवडणुकांपैकी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा बिगुल देखील वाजला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंंघ; राजकीय पक्ष,अपक्ष उमेदवारांची रस्सीखेच

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला :-राज्यातील पाच विधानपरिषद निवडणुकांपैकी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा बिगुल देखील वाजला आहे. महिनाभर चालणाऱ्या निवडणुकीच्या कार्यक्रमात शिक्षक संघटना, राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवार अशी रस्सीखेच रंगण्याची दाट शक्यता आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होऊन ३ डिसेंबर ला मतमोजणी होणार आहे. भाजपा यंदा प्रथमच निवडणुक रिंगणात उतरले असुन सोमवारी प्रा.डॉ.नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी राज्यातील पाचही निवडणुका एकत्र लढणार असल्याचे ना.बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी स्पष्ट केले असुन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना नेते तथा विद्यमान आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत रंगण्याची शक्यता दिसत आहे.

त्यातच शिक्षक महासंघ, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षक संघर्ष संघटना, राज्य शैक्षणिक सल्लागार समिती, विजुक्टा, महाराष्ट्र शिक्षक आघाडी आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षक संघटनांची बांधणी करुन सक्रियपणे काम करणाऱ्या उमेदवारांसोबत राजकीय नेते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

निवडणुकीच्या पुढ्यात संघटना स्थापन करुन निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांचा देखील या निवडणुकीत भरणा असणार आहे. शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जुनी पेंशन योजना अनुदानित शाळांप्रमाणे विना अनुदानित शाळा व त्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नभोवतीच हि निवडणूक होणार आहे.

संघटनांमध्ये दरी तर पक्षांचे उमेदवार चर्चेत
शिक्षकांच्या प्रस्थापित तसेच काही जुन्या संघटनांमध्ये निर्माण झालेल्या दरीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अन्य काही संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात पक्षाचे उमेदवार चर्चेत आहेत. त्यामुळे यंदाची लढत काट्याची ठरणार असल्याचे मानले जात आहे.

loading image