ठाणेदाराच्या ड्रायव्हरनेच घेतली चाळीस हजाराची लाच, न्यायालयाने सुनावला चार दिवसांचा पीसीआर

भगवान वानखेडे
Friday, 28 August 2020

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर ठाणेदाराच्या वाहनचालकास ४० हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) 24 आॅगस्ट रोजी रंगेहात अटक केली होती.

अकोला : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर ठाणेदाराच्या वाहनचालकास ४० हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) 24 आॅगस्ट रोजी रंगेहात अटक केली होती.

या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याचा पीसीआर संपताच गुरुवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करून आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वाशीम जिल्ह्यातील एका ५४ वर्षीय व्यापाऱ्याचा तक्रारीवरून एसीबीने ही कारवाई केली. व्यापाऱ्याचे धान्याने भरलेली तीन वाहने सोडण्यासाठी नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनमध्ये चालक वसीम करीम शेख या लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याने तब्बल ९० हजार रुपये लाचेची नांदगाव ठाणेदाराच्या वाहन चालकास लाच घेताना जुने शहरातील नवीन किराणा मार्केट येथून रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून चाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे एसीबीने सोमवारी पंचांसमक्ष पडताळणी केली. ही कारवाई अकोला एसीबीचे प्रमुख शरद मेमाणे यांच्या निर्देशाने पोलिस कर्मचारी संतोष दहीहांडे, सचिन धात्रक, अभय बावस्कर, इम्रान अली यांनी केली. सदर लाचखोर पोलिस पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जुबेर अद्याप फरार
लाचखोरीच्या या प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक जुबेर नामक खासगी इसम डिटेक्ट केला आहे. तो अद्याप फरार असून, त्यालाही बेड्या ठोकण्यात येणार आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Another four days PCR for corrupt drivers