धक्कादायक! भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला, पोलिस म्हणाले सकाळी नोंदवू तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

अकोला जिल्ह्यातील हातरुन येथील भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकोला: अकोला जिल्ह्यातील हातरुन येथील भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 9 च्या सुमारास सुभाष अग्रवाल हे त्यांच्या मेडिकलमध्ये बसलेले असताना, दोन अज्ञात युवकांनी त्यांना मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून अंदाजे 20 रुपये लुटून नेले.

हातरुन इथे मंगळवारी साप्ताहिक बाजार होता. त्यावेळी ही घटना घडली असून, उपचारासाठी सुभाष अग्रवाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हा प्रकार घडताच सुभाष अग्रवाल यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता आता नाही तर सकाळी तक्रार नोंदवू असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिले असल्याची माहिती आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Assassination of BJP trade front chief Subhash Agarwal, police said to lodge a complaint in the morning