esakal | बच्चू कडू म्हणतात, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

akola news: Bachchu Kadu says, even if Kangana is fielded in Gram Panchayat elections, she will not be elected

आता अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडू म्हणतात, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : मागील काही दिवसांपासून  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे या वादाला सुरुवात झाली असली तरी त्यानंतर कंगनानं शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर मोर्चा उघडला. कंगनाच्या ट्विटला सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनीही जोरदार उत्तर दिलं. त्यानंतर हा वाद आणखी वाढतच गेला.

कंगनानं मुंबईचा पीओके म्हणून उल्लेख केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिलं. मग बीएमसीनेही कंगनाच्या अनाधिकृत बांधकामावर हातोडा मारत तिचं कार्यालय तोडून टाकलं.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे कंगना आणखी भडकली. हा वाद चिघळतोय हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली. यानंतर शिवसेनेने कंगना राणौत या विषयावर पडदा टाकला. कंगनाकडून शिवसेनेवर आता कितीही टीका झाली तरी त्याला शिवसेनेकडून उत्तर न देण्याची भूमिका पक्षाने घेतली.

त्यात आता अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणावरुन बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एखाद्या अभिनेत्रीमागून भाजपा घाणेरडे राजकारण करत आहे हे चुकीचं आहे. कंगनाला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी कंगना आणि भाजपाला फटकारले आहे.