esakal | लाचखोर पुरवठा निरीक्षकाने मागितली साडेपाच हजारांची लाच
sakal

बोलून बातमी शोधा

akola news The bribe-seeking supply inspector demanded a bribe of five and a half thousand rupees

बोरगाव मंजू येथील २५ वर्षीय तरूणाने केलेल्या तक्रारीवरून पुरवठा विभागातील अकोला ग्रामीणचा पुरवठा निरीक्षक नीलेश भास्कर कळसकर याला पाच हजार ५०० रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली.

लाचखोर पुरवठा निरीक्षकाने मागितली साडेपाच हजारांची लाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः बोरगाव मंजू येथील २५ वर्षीय तरूणाने केलेल्या तक्रारीवरून पुरवठा विभागातील अकोला ग्रामीणचा पुरवठा निरीक्षक नीलेश भास्कर कळसकर याला पाच हजार ५०० रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली.
तहसील कार्यालय पुरवठा विभाग अकोला येथे कार्यरत पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर याने तक्रारदार यांचे मालकाच्या दुकानातून कोरोना काळात वाटप झालेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपये निधीचा चेक देण्यासाठी त्या रकमेच्या १० टक्के प्रमाणे पाच हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

परंतु तक्रारदार यांना भिती निर्माण झाल्याने ते सापळा कार्यवाहीकरिता हजर आले नाहीत. पण कळसकर यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणाली प्रमाने कळसकर याला अटक करण्यात आली. ही कारवाई अमरावती व अकोला पथकाने केली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image