
वीना अनुदानित शिक्षक उमेदवार उपेंद्र पाटील मानोरा येथील मतदान केंद्रावर चक्क बनियानवर पोहचले असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.
मानोरा (जि.वाशीम) : वीना अनुदानित शिक्षक उमेदवार उपेंद्र पाटील मानोरा येथील मतदान केंद्रावर चक्क बनियानवर पोहचले असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १ डिसेंबर) रोजी मतदान होत आहे.
यासाठी वाशीम जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजारावर शिक्षक त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शिक्षकांच्या विविध संघटनांचे एकूण २७ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु, खरी लढत मात्र पंचरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने व दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शिक्षकांशी संपर्क साधण्यासाठी उमेदवारांना प्रचंड मोठी कसरत करावी लागली.
शिक्षक उमेदवार यांनी विना अनुदांनीत शिक्षकाच्या व्यथांवर लक्ष केंन्द्रीत करण्यासाठी शर्ट कढून उमेदवारी दाखल केल्याने प्रसिध्दी झोतात आलेल्या उमेदवारानी लग्न संमारंभात सुध्दा विना शर्ट बनियनावर हजेरी लावुन वरतीचे लक्ष वेधले होते.
बनियानवर आलेले उमेदवार पाहिल्यावर उपस्थीताचे लक्ष वेधले अनेकानी हा प्रकार पाहील्यावर कारण विचारले असता हाती माईक घेऊन विना अनुदांनीत शिक्षकाच्या व्यथा काय असतात या वर मत मांडताच उपस्थीताचे डोळे पानावले होते.