पुलावरून ५० फुट खाली पडली कार, दोन युवक जागीच ठार

सागर पनाड
Wednesday, 4 November 2020

वाशिम येथून पुण्याला  जाणाऱ्या युवाकांच्या कार क्रमांक MH ३२ AH ४३६९ ला लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावरील सितान्हाणी पुलाच्या वळण मार्गावर वेगात असलेली कार ५० फुट नादित कोसळून कार  तिन वेळेस पलटी होवून भीषण अपघात झाल्याची घटणा दिनांक ४ ला रात्री २ वाजताच्या दरम्याण घडली.

सुलतानपुर (जि.बुलडाणा) : वाशिम येथून पुण्याला  जाणाऱ्या युवाकांच्या कार क्रमांक MH ३२ AH ४३६९ ला लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावरील सितान्हाणी पुलाच्या वळण मार्गावर वेगात असलेली कार ५० फुट नादित कोसळून कार  तिन वेळेस पलटी होवून भीषण अपघात झाल्याची घटणा दिनांक ४ ला रात्री २ वाजताच्या दरम्याण घडली.

तर कारमध्ये असलेले योगेश दत्ता अंभोरे वय ३० व अजय शंकर इंगोले वय ३२ वर्ष हे जागीच ठार झाले.  तसेच गणेश रमेश वाघ वय २८ वर्ष व ऋषीकेश दत्तात्र्य अदमाणे वय २७ हे गंभीर जख्मी झाले आहेत .

मागील तिन वर्षापासुन पंढरपुर - शेगांव पालखी मार्गाचे काम सुरु असून अपघात स्थळ जवळील नदिपुलाजवळील काम करणे बाकी असून महामार्गा कुठल्याही प्रकारचे सुचना फलक नसल्याने वाहन चालकास रसत्याचा अंदाज येत नसल्याने हा अपघात झाला असावा असे बोलल्या जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: A car fell 50 feet deep from the bridge, killing two youths on the spot