esakal | नामांकीत डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: A case of molestation against a reputed doctor

कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोला शहरात घडली आहे.

नामांकीत डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोला शहरात घडली आहे.

]डॉक्टररांपासून कोणतीही गोष्ट लपविली तर आपणच गोत्यात येतो असे बोलले जाते मात्र याच गोष्टींचा फायदा अनेक जण उचलत असतात त्यातुन विनयभंग सारखे गुन्हे घडत असतात असाच प्रत्यय आज अकोल्यात आला आहे. असे असले तरी अकोल्यात मात्र अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, बुलडाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्याच्या एक छोट्याशा गावात राहणाऱ्या परिवारातील एक पीडिता आपल्या आई आणि भावा सोबत अकोल्यात आली. दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याने दुर्गा चौक स्थित एका नामांकित डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली असता सदर डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला आपल्या कॅबिनमध्ये झोपवले.

पीडितेच्या आईला व भावाला शंका आल्याने त्यांनी या नराधम डॉक्टर आत काय करतो आहे पाहण्याच्या प्रयत्न केला असता या डॉक्टर ने पीडितेच्या आई व भावाला कॅबिन बाहेर काढले व व पीडिते सोबत गैरवर्तन केले असता पीडितेने या  डॉक्टरच्या कानशिलेत पेटवली.

थोड्या वेळाने तपासणी होताच सदर पीडितेने कॅबिनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगताच पीडितेच्या भावाने रामदासपेठ पोलीस स्टेशन गाठून गुन्हा नोंदविला डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप करीत पोलीस स्टेशन गाठल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात डॉक्टरला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्या नोंदविला. विशेष बाब म्हणजे पीडिता ही विकलांग असल्याने या नराधम डॉक्टरावर रोष व्यक्त होत आहे. सदरची कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे, पीएसआय नरेंद्र नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, श्रीकांत पतोंड, विशाल चव्हाण यांनी केली.

loading image
go to top