
गुरुवार (ता. ५) पासून स्विमिंग पूल, योगा संस्था, सर्व प्रकारचे इनडोअर खेळ व चित्रपत्र गृह सुरू करण्याबाबतचे आदेश आदेश अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत.
अकोला ः कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार (ता. ५) पासून स्विमिंग पूल, योगा संस्था, सर्व प्रकारचे इनडोअर खेळ व चित्रपत्र गृह सुरू करण्याबाबतचे आदेश आदेश अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत.
मिशन बिगिन अगेन अंतर्गत गुरुवार (ता. ५) पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करुन जिल्ह्यातील स्विमिंग पूल- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सराव करण्याकरिता, योगा संस्था (या करिता सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कार्यालयाकडून स्वतंत्र मानके निर्गमित करण्यात येतील)
सर्व प्रकारचे इनडोअर स्पोर्टस जसे बॅडमिन्टन, टेनिस, स्काश, इनडोअर शुटींग रेंज इत्यादी, सिनेमा हॉल, थियेटर, मल्टीप्लेक्स, ड्रामा थियेटर हे एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत सुरू करता येईल. सदरचे आदेश ४ नोव्हेंबरपासून संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.
(संपादन - विवेक मेतकर)