तांब्या-पितळचे भांडे स्वयंपाक घरातून होताहेत बाद

akola news Copper-brass utensils are made from the kitchen
akola news Copper-brass utensils are made from the kitchen

शिरपूर जैन (जि.वाशीम)  ः पूर्वीच्या काळी तांब्या-पितळीची भांडी घरात मोठ्या प्रमाणावर वापरली जायची. काळानुरूप या भांड्याची किंमत ही वाढत गेली व बाजारात चकाकणारी स्टील ची भांडे आली. या भांड्यांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याने गृहिणीनी पारंपारिक तांब्या-पितळच्या भांड्याकडे पाठ फिरवली व ही भांडी स्वयंपाक घरातून बाद झाली.
पूर्वी काही मोजक्याच लोकांच्या घरात स्टीलची भांडी दिसायची. यावरून त्या व्यक्तीची श्रीमंती दिसून यायची. आता तर हीच स्टीलची भांडी सर्वसामान्यांच्या घरात पोहोचली. स्वयंपाक गृह चमकदार स्टील भांड्याच्या प्रकाशाने उजळून निघाले.

पूर्वी काळसर, तांबट, पिवळी भांडी स्वयंपाक घरात दिसायची. ती आता पडद्याआड जात आहेत. महिलांच्या विचारसरणीतील बदल व नवनवीन धातूच्या जसे प्लास्टिक, फायबर अशा विविध वस्तूंचे आक्रमण होत असल्याने, महिला वर्गानी स्टीलची भांडी खरेदी करणे देखील कमी केले.

भांड्यांची गरज प्रत्येकाच्या घरात असते आवश्यक भांडी नसली, तर घराला घरपण येत नाही. बहुधा घरातील भांडी खरेदी एकदाच केली जात असते. कार्यक्रमाला जायचे म्हटल्यास यजमानांना भेट घेण्यासाठी स्टील, ॲल्युमिनियम, तांबे किंवा पितळीची भांडी आवर्जून दिले जायचे. यामुळे भांडे व्यवसायालाही वर्षभर तेजी राहायची.

त्यातही दिवाळीच्या दिवसात महिला वर्गाकडून भांड्यांची प्रामुख्याने खरेदी व्हायची. परंतु, आता त्याही पुढे जात प्लास्टिक, फायबर चा वाढता वापर, तसेच इलेक्ट्रॉनिक युग असल्याने, स्वयंपाक घरातील तांब्या-पितळची भांडी मागे पडली यास पाश्‍चिमात्य संस्कृतीचा प्रभाव कारणीभूत ठरत आहे. आताच्या घडीला नातेवाइकाकडे कार्यक्रमास जायचे असल्यास, महिलावर्गात भांड्या ऐवजी गृह सजावटीच्या वस्तू व पुष्पगुच्छ भेट देण्यास अधिक पसंती दिली जात आहे.

त्याला कारण म्हणजे भेटवस्तूंना आकर्षक पॅकिंग करून मिळत असल्याने देणाऱ्याच्या आत्मविश्वासात भर पडत आहे. शिवाय महागाईच्या काळात ग्राहक अधिक चौकस झाल्याने कमी किमतीत मोठी व आकर्षक वस्तू घेण्याकडे तो वळत आहे. परिणामी महिला वर्गाच्या आधुनिक विचारसरणीतून होत असलेल्या खरेदीचा फटका भांडे व्यावसायिकास बसत आहे. पूर्वी असलेल्या तांब्या-पितळी च्या भांड्यांच्या महागाई मुळे व वापरण्यास त्रासिक वाटत असल्याने गृहिणीनी त्याकडे पाठ फिरवली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com