
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून, त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
अकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून, त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोरोना विषाणू कोविड-१९ संसर्गामुळे राज्यभर प्रतिंबंधात्म आदेश लागू केले होते.त्यात शासनाने काही सुट देवून हे निर्बंध नोव्हेंबर अखेरपर्यंत कायम ठेवले.
त्यात आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाद्वारे सुधारित आदेश काढण्यात आला आहे.
निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाउन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.
सदर आदेश ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)