esakal | मृत्यूचा स्फोट, एकाच दिवशी आठ बळी
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Corona virus infection, eight victims in a single day

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचा स्फोट झाला आहे. एकाच दिवशी तब्बल आठ जणाचा बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे एका दिवसी झालेले सर्वाधिक मृत्यू ठरले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी कोरोना संसर्ग तपासणीचे १७५३ अहवाल प्राप्त झाले. त्यात २६३ पॉझिटिव्ह अहवाल आहेत.

मृत्यूचा स्फोट, एकाच दिवशी आठ बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचा स्फोट झाला आहे. एकाच दिवशी तब्बल आठ जणाचा बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे एका दिवसी झालेले सर्वाधिक मृत्यू ठरले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी कोरोना संसर्ग तपासणीचे १७५३ अहवाल प्राप्त झाले. त्यात २६३ पॉझिटिव्ह अहवाल आहेत.
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेतून प्राप्त अहवालांनुसार १७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सकाळी १११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज सायंकाळी ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, काल (ता.६) रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ९१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
.....................
एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू
बुधवारी दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात सकाळी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात-खदान येथील ६० वर्षीय महिला असून, या महिलेस दि.२२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. कुणबीपुरा सिंदखेड ता. बार्शीटाकळी येथील ५९ वर्षीय पुरुष असून, या रुग्णास ता.६ रोजी दाखल केले होते. पारस येथील ७० वर्षीय पुरुष असून, या रुग्णास ता.४ रोजी दाखल करण्यात आले होते. जुने शहर भागातील ५४ वर्षीय पुरुष असून, या रुग्णास ता.४ रोजी दाखल करण्यात आले होते. तुकाराम चौकातील ७२ वर्षीय पुरुष असून, त्यांना आजच मृतावस्थेत दाखल केले होते. रणपिसेनगर येथील ६४ वर्षीय महिला असून, या महिलेस ता.२ रोजी दाखल केले होते. आज सायंकाळी खासगी रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात खोलेश्वर येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे तर अन्य रुग्ण नकाशी ता. बाळापूर येथील ७० वर्षीय महिला रुग्ण आहे. या रुग्णास ता.४ रोजी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात
..................
३१९ जणांचा डिस्चार्ज
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४२, आयकॉन हॉस्पिटल-दोन, हार्मोनी हॉस्पिटल- तीन, क्रिस्टल हॉस्पिटल-पाच, बिहाडे हॉस्पिटल-११, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर-तीन, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल-तीन, हॉटेल स्कायलार्क- दोन, समाजकल्याण वसतीगृह-१८, बार्शीटाकळी कोविड केअर सेंटर-दोन, नवजीवन हॉस्पिटल-दोन, हॉटेल रिजेन्सी-चार, सुर्यचंद्र हॉस्पिटल-तीन, बाळापूर कोविड केअर सेंटर-दोन, ओझोन हॉस्पिटल-चार तर होम आयसोलेशन मधील २१३ असे एकूण ३१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
..........................
ॲक्टिव्ह रुग्ण ३७६३
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या २९ हजार ५५८ आहे. त्यात बुधवारी झालेल्या आठ मृत्यूसह एकूण ४८६ मृत
रुग्ण आहेत. आतापर्यंत २५ हजार ३०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर व गृह अलगिकरणात एकूण तीन हजार ७६३ जणांवर उपचार सुरू आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image