विस वर्षांत काहींना तीन वेळातर काहींना एकदाही नाही कर्जमाफी

Akola News: Debt waiver for some three times in 20 years and not once for some
Akola News: Debt waiver for some three times in 20 years and not once for some

नांदुरा (जि.बुलडाणा) :  दोन ते तीन दशकांपासून राजकीय फंड्यांतून कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखविले गेले. त्यातून अनेकांना कर्जफेडण्याची ऐपत असूनही कर्जमाफीचा तीन-तीनवेळा लाभ मिळाला तर थकीत कर्ज भरण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची नसतानाही एकदाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसलेल्या अनेक शेतकऱ्यांची पत खराब झाली आहे.


गेल्या दोन दशकापासून वेगवेगळ्या सरकारने अटी, शर्थी व निकषांच्या आधारांवर कर्जमाफी केली. काही शेतकऱ्यांचा यात फायदा झाला असेलही; परंतु अजूनही असे काही शेतकरी आहेत की, त्यांना ही कर्जमाफी मिळूच शकली नाही.

का मिळाली नाही याचे नेमके कारणही त्यांना उमजू शकले नाही. कर्जमाफीची आकडेवारी पाहिली तर अजूनही अनेक जुने शेतकरी थकीत कर्जदार आहेत. त्या अवस्थेत पिककर्जापासून कर्जमाफीशिवाय वंचित ठरत आले आहेत. त्यांच्या सातबाऱ्यावरचा कर्जाचा बोजा कायम असल्याने त्यांना कोणत्याच बँका उभ्या करत नसल्याने त्यांची पतच खराब झाली आहे.

पर्यायाने वेळेवर शेतीला पैसे सापडत नसल्याने ते पुन्हा अधिकच्या उत्पन्नापासून परावृत्त होत आहे. असे असताना काही शेतकरी कर्जमाफीचा लाभ भेटून आजही ते बँकांचे पायऱ्या चढत आहेत. एकप्रकारे काही शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याने ज्यांना अजूनही कोणत्याच कर्जमाफीचा लाभ भेटला नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा लाभ घ्यावा, अशी मागणी हे शेतकरी करत आहेत.

कर्जमाफीत शेतीसंबंधी सर्व कर्ज माफ असावे
गेल्या काही वर्षांपासून शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यात फक्त पिककर्जाचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक शेतीसंबंधी जसे विहीर, पाईपलाईन, ठिबकसिंचन, शेतीयंत्रे, औजारे साठीचे कर्ज पण माफीत असावे, असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

मी २००७ या वर्षात पिककर्ज व शेतीसंबंधी कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा येथून घेतले. दुसऱ्याच वर्षी कर्जमाफी झाली. परंतु त्यावर्षी मी नियमित कर्जदार असल्याने कर्जमाफीत बसलो नाही. नंतर आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या कर्जमाफीत सालाचे निकष लागू झाल्याने ते कर्ज माफ झालेच नाही. तेच कर्ज आज चार पटीत वाढले असून, तेव्हापासून कोणत्याच बँकेने कर्ज न दिल्याने आर्थिक परिस्थिती अभावी उत्पन्नात घट संभवत आहे.
- एस.पी.जाधव, शेतकरी, टाकरखेड
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com