काळ आला होता, पण वेळ नाही!, अशोक वाटिका चौकातील थरार

akola news The drivers life was saved by the vigilance of the city traffic police
akola news The drivers life was saved by the vigilance of the city traffic police
Updated on

अकोला  ः म्हणतात ना, काळ आला होता, पण वेळ नाही. याचाच प्रत्यय बुधवारी (ता.२४) दुपारी शहरातील अशोक वाटिका चौकात आला. भरधाव येणाऱ्या ट्रकखाली दुचाकीस्वार आला. मात्र, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे ट्रकखाली दबल्यानंतरही दुचाकीस्वाराचे प्राण वाटले. या थरारक घटनेत दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.


प्रसंग आहे, शहरातील गजबजलेल्या अशोक वाटिका चौकातील. दुपारी १.३० वाजताची वेळ. एक मोठा आईशार ट्रक (क्र. एमएच ३० बीएल ९६३१) हा नेहरू पार्क चौकाकडून खामगावकडे जाण्यासाठी निघाला. अशोक वाटिका चौकातून जेल चौकाकडे वळण घेत असताना मागून एक इसम ज्ञानेश्वर तुकाराम बाजोड (रा. शिवसेना वसाहत) हा दुचाकीने (क्र. एमएच ३० एके ६००२) आला. जेल चौकाकडे जाण्यासाठी घाईघाईत चुकीच्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू लागला.

घाईघाईत त्याची मोटारसायकल स्लिप झाली आण अचानक तो ट्रकच्या पुढील बाजूस मध्यभागी खाली पडला. गाडीसह दुचाकीस्वार ट्रकच्या खाली अडकला. हा घटनाक्रम तिथे कर्त्यव्य बजावत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलिस अमलदार कैलास सानप यांनी बघितला. प्रसंगावधान राखून त्यांनी धावत जाऊन ट्रक चालकाला जागेवरच थांबविण्यास सांगितले.

त्यांचे सहकारी वाहतूक पोलिस अमलदार श्रीकृष्ण गायकवाड यांनी ट्रकखाली अडकलेल्या इसमाला आजूबाजूला जमा झालेल्या नागरिकांचे मदतीने बाहेर काढले. तोपर्यंत खदान पोलिस घटना स्थळावर दाखल झाले होते. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक पोलिस स्टेशनला पाठवला. जखमी इसमास सर्वोपचार रुग्णालयात पाठविले उपचारासाठी पाठवले. अपघातग्रस्त इसमास पायाला किरकोळ मार लागला. वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने वेळीच ट्रक जागेवर थांबविल्याने इसमास कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. उपस्थित नागरिकांनी वाहतूक पोलिस कैलास सानप यांचे कौतुक केले.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com