संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट, कामकाज खोळंबले; व्यवहार ठप्प

Akola News: Due to the strike, the work in the Collector's office has been disrupted; Behavior stalled
Akola News: Due to the strike, the work in the Collector's office has been disrupted; Behavior stalled

अकोला : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात गुरुवारी (ता. २६ ) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील महसूल कर्मचारी पूर्णतः सहभागी झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात अल्प कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

याव्यतिरीक्त दुय्यम निबंधक कार्यालयाचे कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झाल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शासनाच्या तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांच्या महसूल बुडाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

विविध प्रकारच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी इंटक, सरकारी कर्मचारी, निमसरकारी आणि कामगार संघटनांसोबतच बॅंक कर्मचारी संघटनांनी गुरुवारी (ता. २६) संपाची हाक दिली होती. त्यामुळे या सर्व संघटनांनी विविध गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यासोबतच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. महसूल कर्मचारी संघटनेने निदर्शने केली. त्यासोबत इतर संघटनांनी सुद्धा केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध केला. त्यामुळे दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यालयाचे कामकाज खोळंबल्याचे दिसून आले. याव्यतिरीक्त दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा संपात सहभाग घेतल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. त्यामुळे शासनाचा महसूल सुद्धा बुडाला.

हेही वाचा - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपात दुय्यम निबंधक कार्यालयाचे संपूर्ण व्यवहार ठप्प राहिले. संपात सहभागी असल्यामुळे कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार संपूर्ण बंद होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या विभागाचे तीन कार्यालय असून इतर ठिकाणी प्रत्येक तालुक्यात एक कार्यालय आहे. सदर कार्यालयातील कर्मचारी सुद्धा संपावर असल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार बंद होते. या कार्यालयात किमान २०० वर अधिक दस्त नोंदणी करण्यात येत असल्याने शासनाचा तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज आहे.

  •  जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाला संपामुळे दुपारच्या दरम्यान टाळे लागल्याचे दिसून आले.
  •  नझुल, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, महिला व बाल कल्याण विभागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती दुपारनंतर नगण्य दिसून आली नाही. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट होता. कार्यालय मात्र सुरूच होते.
  • निवडणूक, खनिकर्म, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, समाज कल्याण व भूमी अभिलेख, नगररचना विभागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
  • जिल्हा पुरवठा विभागासह शहर पुरवठा विभागातील कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले.


जि.प. कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
ग्राम विकास विभागाकडे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. परंतु शासनाकडून सदर मागण्यांसंदर्भात आतापर्यंत कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने गुरुवारच्या संपात काळ्या फिती लावून काम केले व आंदोलन सहभाग दर्शवला. युनियनच्या सदर भूमिकेमुळे जिल्हा परिषदेत गुरुवारी (ता. २६) कर्मचाऱ्यांची कामावर उपस्थित होते.

संपात २६३ कर्मचारी सहभागी
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संपात पूर्णतः सहभाग घेतला. यावेळी कार्यालयात कार्यरत गट क चे २०१ व गट ड चे ६३ कर्मचारी सहभागी झाले. परंतु संप असल्यानंतर सुद्धा गट अ चे ५८, गट क चे ३६३ व गट ड चे १० कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com