esakal | गुढीपाडव्यावर कोरोनाचे ग्रहण, सराफा, ऑटोमोबाईल सेक्टरसह इतर व्यवसाय संकटात

बोलून बातमी शोधा

akola news Eclipse of corona at Gudipadva, bullion, other businesses including automobile sector in crisis

मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. दरवर्षी गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोना मुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही गुढीपाडवा संकटात आला आहे. सरकारने लॉकडाउन घोषित केल्याने गुढीपाडव्याला होणाऱ्या खरेदीला ग्रहण लागले आहे. यामुळे सराफा व ऑटोमोबाईल सेक्टसह इतर व्यावसायही प्रभावित होणार आहेत.

गुढीपाडव्यावर कोरोनाचे ग्रहण, सराफा, ऑटोमोबाईल सेक्टरसह इतर व्यवसाय संकटात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

शिरपूर जैन (जि.वाशीम)  ः मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. दरवर्षी गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोना मुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही गुढीपाडवा संकटात आला आहे. सरकारने लॉकडाउन घोषित केल्याने गुढीपाडव्याला होणाऱ्या खरेदीला ग्रहण लागले आहे. यामुळे सराफा व ऑटोमोबाईल सेक्टसह इतर व्यावसायही प्रभावित होणार आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. याच दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात येते. गुढीला विजय व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी शुभ कार्याला सुरुवातही करण्यात येते. शेतकऱ्यांपासून सगळेच जण मराठी नववर्ष उत्साहात साजरे करतात, तसेच गुढीपाडव्याला सोने व वाहन खरेदी करण्याची प्रथा आहे.

यासह कपडे व अन्य वस्तूंची खरेदी देखील करण्यात येते. यामुळे बाजारात चांगलीच गर्दी दिसून येत असते. गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारात मोठी उलाढाल होते. परंतु, कोरोना संसर्गाच्या संकटामुळे राज्य सरकारने मिनी लॉकडाउन घोषित केला. दरम्यान घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे शुभकार्य लांबणीवर पडणार आहेत. वाहन व सोने खरेदीवर याचा मोठा प्रभाव पडणार असून, नवीन दुकाने व ले-आऊटवर देखील संकट येणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने बऱ्याच वाहनांची बुकिंग झाली आहे. मात्र, गुढीपाडव्याला घरी येणाऱ्या वाहनांची डिलिव्हरी आता थांबणार आहे. मिनी लॉकडाउन लावण्यात आल्याने वाहनांची डिलिव्हरी देणे शक्य होणार नाही. गतवर्षी देखील गुढीपाडवा, अक्षय तृतीयाला दुकाने बंद होती.

यंदाही मिनी लॉकडाउन करण्यात आल्यामुळे सराफा व्यावसायाशी जुळलेले सोनार, कारागीरांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महिन्यापूर्वी पासून गुढी पाडाव्यासाठी व्यावसायिकांची तयारी सुरू झाली होती. परंतु, आता दुकाने बंद असल्याने या व्यावसायाला मोठा फटका बसणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)