
जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे १६ मार्च रोजी नव्याने आरक्षण निश्चित करून तहसिल स्तरावर सोडत काढण्यात आली होती. आता या रिक्त जागी सदर प्रवर्गातील सदस्याची सरपंच पदावर ८ एप्रिलला ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत निवड करण्यात येईल.
१६ ग्रामपंचायत सरपंचांची निवडणूक ८ एप्रिल रोजी
अकोला ः जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे १६ मार्च रोजी नव्याने आरक्षण निश्चित करून तहसिल स्तरावर सोडत काढण्यात आली होती. आता या रिक्त जागी सदर प्रवर्गातील सदस्याची सरपंच पदावर ८ एप्रिलला ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत निवड करण्यात येईल.
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीत २०२१ मध्ये पार पडल्या, तर ९ व ११ फेब्रुवारीला विशेष सभा घेवून सरपंच, उपसरपंच पदी निवड सुद्धा करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील १६ ग्रामपंचयातींमध्ये संबंधित प्रवर्गातील सदस्यच नसल्याने या रिक्त पदांसाठी नवीन आरक्षण जिल्हा प्रशासनाला काढावे लागले आहे. त्यानंतर आता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड करावी लागेल. सरपंच निवडीची जबाबदारी महसूल मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, पुरवठा निरीक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
----------
या ग्रामपंचायत सरपंचाची होणार निवडणूक
तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी, सौंदळा, वांगरगाव. अकोट तालुक्यातील चोहोट्टा, सावरा, मक्रमपूर, मंचनपूर, पातोंडा. अकोला तालुक्यातील खांबोरा. बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर. बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड, पातूर तालुक्यातील चरणगाव, दिग्रस खुर्द, आलेगाव, विवरा, चतारी.
(संपादन - विवेक मेतकर)
Web Title: Akola News Election 16 Gram Panchayat Sarpanches 8th April
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..