भाजपच्या तीन आमदारांच्या घरासमोर विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार

पंकज भारसाकळे
Monday, 5 October 2020

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटना जिल्हा अकोला यांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी अकोल्यातील आमदारांच्या घरासमोर बसून आंदोलन केले.

तेल्हारा (जि.अकोला) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटना जिल्हा अकोला यांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी अकोल्यातील आमदारांच्या घरासमोर बसून आंदोलन केले.

प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख या तिघांच्याही निवासस्थानी दिवसभर धरणे दिले.

यावेळी संघटनेचे प्रा. संतोष वाघ (राज्य कार्याध्यक्ष) प्रा. गणेश ढोरे (विदर्भ प्रांताध्यक्ष), प्रा. संगपाल सोनवणे (औरंगाबाद विभाग प्रमुख), प्रा. श्रीकांत पळसकर (अकोला जिल्हाध्यक्ष) प्रा. सदानंद बाणेरकर( राज्य प्रसिद्धि प्रमुख), प्रा. माधव बावणेर, प्रा. राजेंद्र इंगळे, प्रा. संदीप सरकटे, प्रा. विजय गावंडे, प्रा. श्रीधर भदे आदींची उपस्थित होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Elgar of unaided teachers in front of the houses of three BJP MLAs