एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये एक महिला, चार पुरुषांचा समावेश

भगवान वानखेडे
Thursday, 3 September 2020

अकोला आणखी एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणुन उदयास येत आहे. कारण, अकोल्यात बुधवारी (ता.२) एकाच दिवशी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, दिवसभरात ६४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

अकोला : अकोला आणखी एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणुन उदयास येत आहे. कारण, अकोल्यात बुधवारी (ता.२) एकाच दिवशी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, दिवसभरात ६४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

बुधवारी सकाळी ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २० महिला व ४२ पुरुष आहे. त्यात मूर्तिजापूर येथील २४ जण,आलेगाव येथून सहा जण, गोरक्षण येथे चार, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, पातूर येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, शिवचरण पेठ, कृषी नगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित रणपिसे नगर, गणेश नगर, कान्हेरी गवळी, ज्योती नगर, बाळापूर, बोरगावमंजू, जुने शहर, कौलखेड, वाडेगाव, जठारपेठ, मोठी उमरी, कुरणखेड व इंदिरा नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दरम्यान मंगळवारी रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. तर सायंकाळी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष असून, ते बाळापूर व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.

दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे.

पाच जणांच्या मृत्यूची नोंद
बुधवारी सकाळी प्राप्त अहवालात दोन जणाचा मृत्यू झाला. यात रामदास पेठ येथील ७६ वर्षीय पुरुष असून, तो २६ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर मूर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून, तो २८ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता.त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. दरम्यान सायंकाळी प्राप्त अहवालात तिघांचा मृत्यू झाला. त्यात मूर्तिजापूर येथील २३ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर घेतलेल्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बाळापूर येथील २६ वर्षीय पुरुष पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच मूर्तिजापूर येथील ६१ वर्षीय महिला असून, तिचा खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला.

३३ जण कोरोनामुक्त
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, हॉटेल रणजीत येथून तीन जण तर कोविड कोरोना सेंटर, हेडज मूर्तिजापूर येथून १३ जणांना अशा एकूण ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४१४२
मृत्यू -१५९
डिस्चार्ज- ३२८६
दाखल रुग्ण -६९७
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Five killed in a single day