esakal | भय इथले संपत नाही...!, आणखी चार मृत; १११ कोरोना बांधितांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Four more dead; Addition of 111 corona bindings

जिल्हा व महानगरपालिका हद्दीतील कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात मृतांची संख्याही वाढत असल्याने कोरोनाबाबतचे भय संपत नसल्याची स्थिती आहे. बुधवारी आणखी १११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला.

भय इथले संपत नाही...!, आणखी चार मृत; १११ कोरोना बांधितांची भर

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : जिल्हा व महानगरपालिका हद्दीतील कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात मृतांची संख्याही वाढत असल्याने कोरोनाबाबतचे भय संपत नसल्याची स्थिती आहे. बुधवारी आणखी १११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला.


शारकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना चाचणी लॅबकडून बुधवारी(ता.९) एकूण ४१८ अहवाल प्राप्त झालेत. त्यात पॉझिटिव्ह अहवालांची संख्या १११ आहे. सकाळी प्राप्त अहवालानुसार ८८ जण पॉझिटिव्ह आढळले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यात सायंकाळी २३ जणांची भर पडली. दरम्यान, आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६४ जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून २८ जण, हॉटेल रिजेन्सी येथून पाच जण, तर कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून एकाला असे एकूण ९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

चौघांचा मृत्यू
कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी प्राप्त अहवालानुसार अकोट फैल, अकोला येथील ६६ वर्षीय पुरुष, गणेश नगर डाबकी रोड, अकोला येथील ८४ वर्षीय पुरुष आणि बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. बुधवारी दुपारनंतर रजनापूर, ता. मूर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला. तो ता. ५ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता.

या भागात आढळले रुग्ण
म्हैसांग व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ जण, जीएमसी येथील सात जण, कट्यार, खदान व तांदळी बु. ता. पातूर येथील चार जण, लहान उमरी, सिंधे कॅम्प, मोठी उमरी, गौरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, जठारपेठ, पोलिस स्टेशन चन्नी, कौलखेड, रजपूतपुरा ता. बाळापूर, रेणूका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित पिंपरगाव छाब्रे ता. बार्शीटाकळी, परसोबढे, खेडा, गिता नगर, संत नगर, रणपिसे नगर, कुबेर नगर, गीता नगर, रेल्वे पोलिस, मालीपूरा, वाखना वाघ, पिंपरी ता.अकोट, खेतान नगर, दिगरस ता. पातूर, अकोट फैल, खापरवाडा, वाडेगाव ता.बाळापूर, जूने शहर, केशवनगर, मलकापूर, निमवाडी, तापडीया नगर, पिंजर, तेल्हारा, शास्रीनेनगर, मुर्तिजापूर व बेलूरा (खु.) येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आळशी प्लॉट येथील चार जण, गोरक्षण रोड येथील तीन जण, गाडेगाव ता. तेल्हारा, रामदास पेठ, कौलखेड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित महसूल कॉलनी, जठारपेठ, मलकापूर व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

कोरोना मीटर
- पॉझिटिव्ह - ४९६४
- मयत - १७२
- डिस्चार्ज - ३७२६
- ॲक्टिव्ह रुग्ण - १०६६
(संपादन - विवेक मेतकर)

loading image