esakal | कोरोनाचे आणखी चार बळी; १०४ नवे रूग्ण आढळले
sakal

बोलून बातमी शोधा

 Four more victims of Corona; 104 new patients were found

 कोरोनामुळे मंगळवारी (ता. ३०) आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासोबतच १०४ नवे रूग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ४५१ झाली आहे. त्यासोबतच ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार ३१९ झाली आहे. दरम्यान मंगळवारी ४१४ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

कोरोनाचे आणखी चार बळी; १०४ नवे रूग्ण आढळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोनामुळे मंगळवारी (ता. ३०) आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासोबतच १०४ नवे रूग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ४५१ झाली आहे. त्यासोबतच ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार ३१९ झाली आहे. दरम्यान मंगळवारी ४१४ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ३०) २३० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८१ अहवाल निगेटिव्ह आले. त्यासोबतच १०४ त्यात ४९ आरटीपीसीआर व रॅपिडच्या ५५ रूग्णांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त चार रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यात पहिला रुग्ण वाशिम बायपास, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष होते. त्यांना २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू रामदासपेठ, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. त्याला २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू मनोरथ कॉलनी डाबकी रोड, अकोला येथील ४५ वर्षीय महिलेचा झाला. या महिलेस २५ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. चौथा मृत्यू मोठी उमरी येथील २७ वर्षीय महिलेचा झाला. सदर महिलेला ३० मार्च रोजी रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले. सदर चार मृत्यूनंतर आता जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ४५१ झाली आहे.
---------------------
या भागात आढळले नवे रूग्ण
मंगळवारी (ता. ३०) सकाळी ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १३ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी येथील चार, मूर्तिजापूर, मोठी उमरी व अकोट येथील प्रत्येकी तीन, शास्त्री नगर, मलकापूर, कौलखेड, रणपिसे नगर, महान, सिंधी कॅम्प व पारस येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित वाडेगाव, रामधन प्लॉट, हिंगणा रोड, उगवा, डाबकी रोड, सहकार नगर, खडकी, तुकाराम चौक, आदर्श कॉलनी, जीएमसी, गिता नगर, शेलू बोंडे, रुद्रायणी, पातूर, पत्रकार कॉलनी, तेल्हारा, बेलूरा, रामदासपेठ, वाशीम बायपास, कॉग्रेस नगर, हिवरा व निंबा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे.
----------------------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - २७४४४
- मृत - ४५१
- डिस्चार्ज - २०६७४
- ॲक्टिव्ह रूग्ण - ६३१९

(संपादन - विवेक मेतकर)

loading image