थंडीचा वाढता जोर रब्बी पिकासाठी पोषक !

Akola News: Growing cold is nutritious for rabi crop!
Akola News: Growing cold is nutritious for rabi crop!

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) :  गेल्या काहि दिवसांपासून मेहकर तालुक्यात थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याने सकाळच्या सुमारास  वातावरणात कडाक्याची थंडी जाणवत आहे. वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक  व पोषक ठरत आहे. वातावरणात थंडीचे प्रमाणात अधिक जाणवत असल्यामुळे नागरीकांकडून उबदार कपडयांच्या मागणी वाढ झाली.

थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे मार्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हिवरा आश्रम परीसरात गहू,हरभरा,कांदा,भाजीपाला आदि पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली आहे. रब्बी पिकांसाठी वाढणारी थंडी अत्यंत पोषक ठरत आहे.

या थंडीमुळे सर्व पिके टवटवीत झाली आहे. या वाढणाऱ्या थंडीमुळे पिकांवर होणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होऊन पिकांच्या उत्पादन वाढीस  थंडीचा फायदा होईल. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासठी लहान मुले,स्त्री,पुरूष व वृध्द स्वेटर,मफलर,जॅकेटचा मोठया प्रमाणात उपयोग करीत आहेत.

लहान मुलांपासून ते जेष्ठ व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण उबदार कपडे परिधान करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल लागताच सकाळी आरोग्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक असलेल्या थंडीचा आनंद घेण्यासाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्या स्त्री,पुरूष व वृध्दांच्या संख्येत सुध्दा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काहि दिवसांमध्ये रात्रीच्या तापमानात झपाटयाने घसरण झाली आहे.

त्यामुळे सायंकाळी ६ वाजेनंतर थंडीचे प्रमाण चांगलेच जाणवत आहे. काहि दिवसांपासून मेहकर तालुक्यातील तापमानाचा पारा खाली आला आहे. किमान व कमाल तापमानात घसरण झाली असल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन कडाक्याची थंडी अंगाला चांगलीच झोंबू लागली आहे. थंडीमुळे रब्बी हंगामात उत्पादनात वाढ होईल या आशेमुळे शेतकरी सुखावला असल्याचे दिसून येत आहे.

रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांसाठी वाढणारी थंडी अत्यंत लाभदायक आहे. या थंडीमुळे पिकांची वाढ होते. वाढत्या थंडीमुळे हरभऱ्यावरील घाटे आळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
प्रा.समाधान जाधव,विभाग प्रमुख कृषिविद्या विवेकानंद कृषि महाविद्यालय हिवरा आश्रम

हिवाळा ॠतु आरोग्यासाठी उत्‍तम
हिवरा  ॠतू मानवाच्या आरोग्यासाठी सर्वात उत्‍तम समजला जातो. हिवाळयात भूक भरपूर लागते आणि खाल्लेल अन्न सुध्दा लवकर पचन होते. शरीराला भरपूर उर्जा मिळते. त्या तुलनेत ती कमी खर्च होते. हिवाळयात किती काम केले तरी थकवा येत नाही. उन्हाळयामध्ये लागणाऱ्या उर्जेचा साठा हिवाळयात होत असल्यामुळे हिवाळा हा उर्जा संग्रहणासाठी महत्वाचा ॠतू आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com