पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश, म्हणाले जिल्ह्यासाठी ४५० खाटा अतिरीक्त तयार ठेवा!

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 23 September 2020

 जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात शंभर अतिरीक्त खाटांची म्हणजेच जिल्ह्यासाठी अतिरीक्त ४५० खाटांची सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

अकोला :  जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात शंभर अतिरीक्त खाटांची म्हणजेच जिल्ह्यासाठी अतिरीक्त ४५० खाटांची सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करणे अत्यावश्यक असून त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत ज्यादा पन्नास बेडची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. अकोला महानगरपालिका क्षेत्रात अकोला महानगरपालिकेतर्फे १०० बेडची जादा सुविधा उपलब्ध करण्यात यावी.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील अतिदक्षता विभागातील बेडची संख्या वाढवण्यात यावी, असे निर्देश बच्चू कडू यांनी दिले. जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत उपचार सुविधांमध्ये कमतरता भासू न देण्याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. जिल्ह्यात मास्कचा वापर करणे सामाजिक अंतर राखणे तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही निर्देश बच्चू कडू यांनी दिले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Guardian Minister Bachchu Kadu instructions, said keep 450 extra beds ready for the district!