esakal | फोटो काढण्यापुरतेच उरले बांधावरचे मार्गदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Guidance on the rest of the dam just for taking photos

कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन, पिकांवरील विविध किडींच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना करायच्या, यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

फोटो काढण्यापुरतेच उरले बांधावरचे मार्गदर्शन

sakal_logo
By
पी.डी. पाटील

रिसोड, (जि.वाशीम) : कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन, पिकांवरील विविध किडींच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना करायच्या, यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

परंतु, या कोरोना काळात बहुतांश कृषी सहाय्यक नाॅटरिचेबल होते. अनेक कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मार्गदर्शनाऐवजी फक्त शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे फोटो काढताना दिसून आले. आता तरी तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतील का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


रिसोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार हा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. अनेक योजनांची अंमलबजावणी होत नाही. योग्य लाभार्थ्यांना डावलत असल्याच्या तक्रारी अनेकदा पालकमंत्र्यांपर्यंत जातात व वेळोवेळी या कार्यालयातील तत्कालीन कृषी अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतरही कार्यालयातील कामकाजामध्ये बदल दिसता दिसेना. तालुका कृषी अधिकारी म्हणून काव्याश्री घोलप यांनी पदभार सांभाळल्या नंतर तरी, कृषी सहाय्यकांच्या बेधुंद कामात काही तरी बदल होईल


अशी अपेक्षा होती परंतु, हा बदलही शेतकऱ्यांच्या मुळावरच दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील एकाच सोयाबीन वाणाची पेरणी केल्या जात असल्याने. अतिवृष्टी, अल्पवृष्टी सह विविध किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्ता वैतागला आहे. याची दखल घेत मागील काही दिवसांमध्ये विविध माध्यमातून तालुका कृषी विभागाच्या धोरणावर ताशेरे ओढल्यानंतर अनेक कृषीसाहाय्यक रस्त्यावरील गावामध्ये, रस्त्यालगतच्या शेतामध्ये सोशलडिस्टंंन्सिंगचा फज्जा उडवित शेतीपीक माहितीच्या नावाखाली फक्त फोटोसेशन पार पाडत आहेत.

विशेष म्हणजे या फोटोमध्ये गावातील प्रमुख व्यक्तींना भुलथापा देत तालुका कृषी अधिकारी यांना सदर फोटो दाखवन्याकरिता काढले जात आहेत. परंतु गावाच्या अनेक शेतशिवारामध्ये आजही कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाचा अभाव आहे.

भूमिहिन युवकांनाही केल्या जाते शेती मार्गदर्शन
भर जहागिर येथे सोमवारी (ता.७) कृषी सहाय्यकांनी काही व्यक्तींना शेती पिकाविषयी मार्गदर्शन मिळणार म्हणून भ्रमणध्वनी केले. परंतु मार्गदर्शन फक्त चहापाण्यापर्यंत मर्यादित राहीले. कृषी सहाय्यकाला फक्त वरिष्ठांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतानाचा फोटो दाखवायचा होता. विशेष म्हणजे या फोटोतील काही युवक भूमिहिन आहेत. त्यामुळे कृषी विभागाची लक्तरे वेशीला टांगण्याचा पराक्रम ही आता कृषी सहाय्यकांद्वारे होत असल्याचे दिसून येते.

कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन सत्य परिस्थिती म्हणजे पिकावरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य फिजिकल डिस्टंंन्सिंग ठेवत मार्गदर्शन करावे. घडलेल्या या चुकिच्या प्रकाराविषयी संबंधित कृषी सहाय्यकाची निश्चित विचारणा केली जाईल.
- काव्याश्री घोलप, तालुका कृषी अधिकारी, रिसोड
(संपादन- विवेक मेतकर)