esakal | तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत खातेच केले हॅक, केबीसीच्या नावाखाली फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: hacked the customers account saying that you have won the lottery of Rs 25 lakh

केबीसी अंतर्गत २५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून व्हॉट्स ॲप खाते हॅक करण्याचे प्रकार खेडेगावापर्यंत पोहचले आहेत. असाच प्रकार तालुक्यातील बोडखा गावात समोर आला.

तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत खातेच केले हॅक, केबीसीच्या नावाखाली फसवणूक

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : केबीसी अंतर्गत २५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून व्हॉट्स ॲप खाते हॅक करण्याचे प्रकार खेडेगावापर्यंत पोहचले आहेत. असाच प्रकार तालुक्यातील बोडखा गावात समोर आला.

एकाला व्हॉट्स ॲपवरून मुबईच्या बँक मॅनेजरला कॉल करण्याचे सांगून त्याचे व्हॉट्स ॲप खाते हॅक केले. दुसऱ्या तरुणालाही असाच ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून लॉटरी लागल्याचे सांगण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हा मेसेज फेक असल्याची शंका आल्याने तातडीने व्हॉट्स ॲप खाते हॅक झालेल्या तरुणाने आपले बँकेचे खातेमध्ये बदल करून घेतले. दुसऱ्याला हॅकचा प्रकार माहीत पडताच त्याने कॉल करण्याचे टाळले.

ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर क्राईम करण्याच्या हेतूने बाहेर राज्यातील टोळके व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून प्रलोभन देऊन, असे कृत्य करत असावे. अशा फेक किंवा विघातक लोकांपासून प्रत्येकाने सावधान राहावे. अन्यथा फसवणूक झाले शिवाय राहणार नाही.


सद्यस्थितीत खेडे गावात घराघरात ॲनरॉईड मोबाईल पोहचले आहेत. याचा च फायदा घेत फसवणूक करणारे वेगवेगळ्या शक्कल लढवून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार करीत आहेत. अशा घटना दररोज कुठे ना कुठे सुरूच आहेत. अगोदर शहरापुरते असे प्रकार मर्यादित होते. मात्र आता खेड्याकडे हॅकर्स नी आपला मोर्चा वळवला असावा, असे या घटनेवरून म्हणता येईल.

तीन दिवसा अगोदर बोडखा गावातील एका तरुणाला हिंदी मधील ऑडिओ क्लिपचा व्हॉट्स ॲप मेसेज आला. त्यामध्ये सदर व्यक्ती दिल्ली वरून बोलत असल्याचे सांगते. तुमचा व्हॉट्स ॲप नंबरला ‘कौन बनेगा करोडपती’ या अंतर्गत २५ लाखाची लॉटरी लागली आहे, असे सांगून या लॉटरीचे पैसे घेण्या संदर्भात अधिक माहितीसाठी मुबंईच्या स्टेट बँकचे व्यवस्थापक सोबत बोलण्या बाबतही सांगितले.

मुबईच्या बँक अधिकाऱ्यांसोबत फक्त व्हॉट्स ॲप कॉल वरूनच बोलता येईल, अशी अटसुद्धा टाकली जाते. तुमाला जी लॉटरी लागली ती व्हॉट्स ॲप नंबरची आहे. म्हणून माहितीसाठी त्याच व्हॉट्स ॲप नंबरवरून कॉल करण्याचे सांगितले जाते. कॉल करताबरोबर सदर व्हॉट्स ॲप हॅक केल्याचा प्रकार समोर आला. सदर तरुणाला फेक बाबत भनक लागताच त्याने आपले बँक डीटीयलमध्ये तातडीने बदल करून घेतले.

(संपादन - विवेक मेतकर)