मन हेलावणारी घटना: नीट परीक्षेचा पेपर चांगला गेला नाही म्हणून त्याने घरातच गळफास  लावून केली आत्महत्या

मुशीरखान कोटकर
Friday, 18 September 2020

नुकतेच नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (ता.१७) दुपारनंतर उघडकीस आली नीट परीक्षेचा पेपर अपेक्षेप्रमाणे सोडविल्या न गेल्या मुळे सदर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा कयास लावण्या जात आहे 

देऊळगाव मही (जि.बुलडाणा) :  ‘नीट’ ही वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची व स्पर्धात्मक परीक्षा आहे. या अभ्यासक्रमाची व्याप्ती खूप असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी सखोल तसेच नियोजनपूर्ण अभ्यास करणे खूपच गरजेचे आहे. या परीक्षेला विचारलेले प्रश्न हे ज्ञान, उपयोजन, कौशल्य व आकलन यावर आधारित असतात. 

मात्र,  नुकतेच नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (ता.१७) दुपारनंतर उघडकीस आली नीट परीक्षेचा पेपर अपेक्षेप्रमाणे सोडविल्या न गेल्या मुळे सदर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा कयास लावण्या जात आहे 

अविनाश अनंथा इंगळे वय १८ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून देऊळगाव मही येथील माजी सरपंच सुनीताताई अनंथा इंगळे यांचा  तो मुलगा होता आज दुपारनंतर त्यांच्या राहत्या घरी अविनाश याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे कुटुंबातील व्यक्तींना दिसले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पोलीस पाटील यांच्या कडून प्रथम माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अविनाश याने नुकतेच नीट ची परीक्षा दिली होती सदर परीक्षेत अपेक्षित यश मिळणार नाही या विवंचनेत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कयास लावला जात असून त्याच्या आत्महत्येनंतर देऊळगाव मही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

 

नीट’ अवघड का वाटते?
दहावीत मिळालेले गुण हे केवळ चांगल्या महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र दहावीत मिळालेल्या टक्केवारीवरून मुलांची बौद्धिक क्षमता ठरवणे योग्य ठरणार नाही. दहावीचा अभ्यासक्रम अत्यंत कमी असून पाठांतर करून लिहिल्यानंतर ९५ टक्क्य़ांपर्यंत सहज मार्क मिळू शकतात. त्यामुळे या गुणांवरून मुलगा किती हुशार आहे, असे समजणे योग्य ठरणार नाही. पाठ करणे आणि समजून घेणे यामध्ये फरक आहे. सीईटीमध्येही पाठांतर करून लिहिणे शक्य होते मात्र ‘नीट’मध्ये संकल्पना समजण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे अनेक मुलांना संकल्पना समजून घेण्यात अडचणी आल्याने “नीट” अवघड वाटते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: He committed suicide by hanging himself at home as his exam papers did not go well