नवनीत राणाला शिवसेनेचा वाघ कसा कळेल!

akola news  How will Navneet Rana know ShivSenas tiger!
akola news How will Navneet Rana know ShivSenas tiger!
Updated on

अकोला : ः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर केलेल्या आरोपाचा शिवसेनेच्या अकोला जिल्हा महिला संघटिका देवश्री ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नवनीत राणा या नावाप्रमाणेच राजकारणात नवीन असून, त्यांना शिवसेना कशी कळेल, असे ठाकरे म्हणाल्यात.


खासदार नवनीत राणा ही महाराष्ट्रात राहते व महाराष्ट्र विरोधी धोरण अंगीकारते, असा आरोप ठाकरे यांनी केला. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाचा ऐेकरी उल्लेख तसेच असभ्य भाषेत बोलताना तिला संस्कृतीची आठवण होत नाही.

यापुढे ज्याची पण ठाकरे साहेबांबद्दल बोलताना जिभ घसरेल त्याची जिभ जबड्यातच हात घालून ओढण्यात येईल, असा इशाराही देवश्री ठाकरे यांनी दिला. आकसापोटी अरविंद सावंत यांच्यावर आरोप केले आहेत.

खासदार सावंत हे शिवसेनेत बाळासाहेबांच्या तालमीत घडलेला सच्चा शिवसैनिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब यांचे स्त्रियांबद्दलचे विचार एक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून एखाद्या महिला खासदाराबाबत असला कोणताच प्रकार होऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com