esakal | दिंडी मर्गावरील धुरळ्याने शेकडो प्रवाशी व शेतकरी हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News; Hundreds of commuters and farmers harassed by dust on Dindi Marg

अकोला - शेगाव मार्गावरील अपूर्ण काम, खड्डे आणि धूळ यामुळे प्रवाशांसह शेतकरी पुरते हैराण झाले असून खड्डे व धुरळ्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर तातडीने पाणि टाकण्यात यावे या मागणीसाठी आज "जागो" दिंडी च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

दिंडी मर्गावरील धुरळ्याने शेकडो प्रवाशी व शेतकरी हैराण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि.अकोला) : अकोला - शेगाव मार्गावरील अपूर्ण काम, खड्डे आणि धूळ यामुळे प्रवाशांसह शेतकरी पुरते हैराण झाले असून खड्डे व धुरळ्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर तातडीने पाणि टाकण्यात यावे या मागणीसाठी आज "जागो" दिंडी च्या वतीने आंदोलन करण्यात आले.


बाळापूर तालुक्यातील निमकर्दा, गायगाव मार्गे जाणाऱ्या शेगाव मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. शिवाय या रस्त्याचे चौपदरीकरण होत असल्याने काम सुरू आहे. मात्र हे काम अनेक दिवसांपासून अपुर्ण आहे.


पावसाळ्यात या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचा वापर केला होता. आता उन पडू लागल्याने वाहने जावून खड्डयांतून धूळ बाहेर उडत आहे. व त्याच बरोबर रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावरील माती वाहनांमुळे उडत आहे. याचा प्रचंड त्रास शेतकरी, वाहन चालक, दुचाकिस्वार व प्रवाशांना होत आहे. तसेच मार्गा शेजारील दुकानदार, हॉटेल व्यवसायीक व रहिवाशी देखील त्रस्त झाले आहेत. तर या धुळी मुळे शेतीला देखील खूप हानी पोहोचत आहे.

त्यामुळे शेतकरी सुध्दा वैतागून गेलेे आहेत.
शेगाव मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी त्यामध्ये खडी आणि माती टाकली होती. आता मात्र ऊन आणि वाहने जावून खड्डयांतील माती व खडी बाहेर येवून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.


त्यामुळे या रस्त्यावर दररोज पाणी मारण्यात यावे याची मागणी केली आहे. हे आंदोलन गायगाव ते निमकर्दा स्थित "गो अहेड इन्फ्रा" या कन्स्ट्रक्शन्सच्या कार्यालयापर्यंत करण्यात आले.


मागणी पूर्ण न झाल्यास शेकडो शेतकरी व प्रवाशांंसह हे आंदोलन अधिकच तिव्र करणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. यावेळी शंकरराव ताठे, अक्षय साबळे, गोपाल पोहरे,योगेश ढोरे, स्वप्नील पाठक, तुषार ताले,सचिन जामोदे,देवानंद साबळे, सागर उमाळे, दत्ता गिर्हे,शिवशंकर डंबाळे, गोपाल आगरकर,लोकेश गावंडे,रितेश गोरे,विनोद वाकोडे,नागेश वानखडे,गोपाल सातरकर,रवी जुंजाळेकर,ज्ञानेश्वर इढोळ, बाळा झटाले,छोटू धांडे,नागनाथ इंगळे, संकेत भाकरे इत्यादी आंदोलनकर्ते उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उरळ ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image