esakal | बंद मंदिरातील देव रोज येतो घरी!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Hundreds of families take advantage of daily online darshan

मागील पाच महिण्यांपासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाउन सुरू केले. या दरम्यान सर्वच बाबी ठप्प झाल्या. सार्वजनिक ठिकाणची गर्दी बंद केल्याने सर्वच देवळाचे द्वार बंद झाले. यामध्ये अनेक भक्तांचा हिरमोड झाला. मात्र, रिसोड येथील चाफेश्वर आरती मंडळाच्यावतीने ईश्वरदास तोष्णीवाल यांनी ऑनलाइन चाफेश्वर दर्शनाची प्रथा अस्तित्वात आणली असून ही प्रथा मागील पाच महिण्यापासून व्हाॅट्सॲप गृपद्वारे अविरत सुरू आहे.

बंद मंदिरातील देव रोज येतो घरी!

sakal_logo
By
पी.डी. पाटील

रिसोड (जि.वाशीम) : मागील पाच महिण्यांपासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाउन सुरू केले. या दरम्यान सर्वच बाबी ठप्प झाल्या. सार्वजनिक ठिकाणची गर्दी बंद केल्याने सर्वच देवळाचे द्वार बंद झाले. यामध्ये अनेक भक्तांचा हिरमोड झाला. मात्र, रिसोड येथील चाफेश्वर आरती मंडळाच्यावतीने ईश्वरदास तोष्णीवाल यांनी ऑनलाइन चाफेश्वर दर्शनाची प्रथा अस्तित्वात आणली असून ही प्रथा मागील पाच महिण्यापासून व्हाॅट्सॲप गृपद्वारे अविरत सुरू आहे.


रिसोड नगरिला पौराणिक महत्त्व प्राप्त असून, ‘ॠषिवट’ हे नाव पौराणिक ग्रंथांमध्ये आढळून येते. येथे संत अमरदास आरती मंडळ, जय हनुमान आरती मंडळ, खंडोबा आरती मंडळ, सातारकर बाबा आरती मंडळ, आप्पास्वामी आरती मंडळ, संत गजानन महाराज आरती मंडळ, अशा विविध धार्मिक आरती मंडळांच्या माध्यमातून नित्यक्रमाने आरती, पुजाअर्चा चालत होत्या.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परंतु प्रशासनाने लॉकडाउन जारी केल्यानंतर बहुतांश आरती मंडळांना मंदिरामध्ये आरतीकरिता जाणे बंद करावे लागले. चाफेश्वर आरती मंडळाच्यावतीने मंदिरातील शिवलिंगाची दररोज विशेष फुलांच्या माध्यमातून आकर्षक सजावट करण्याची परंपरा होती. ही परंपरा कामय ठेवत, मंडळाच्या वतीने व ईश्वरदास तोष्णीवाल यांच्या माध्यमातून येथील मंदिरातील दररोज करण्यात येणाऱ्या विशेष पुजेचा फोटो व्हाॅट्सॲप गृपच्या माध्यमातून भाविकांना पाटवून दररोजचे दर्शन देण्याचा उपक्रम राबविल्या जात आहे. या आरती मंडळामध्ये व्यापारी, पत्रकार, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी, खेळाडु, ज्येष्ठ नागरिक, अशा विविध गटातील व्यक्ती असल्याने हा सामोपचारीक उपक्रम राबविला जात आहे.

मागील पाच महिण्यापासून लाॅकडाउन सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही उपाय योजना आहे. या दरम्यान आरती मंडळाचा, भाविकांचा हिरमोड होणार नाही म्हणून, दररोज चाफेश्वर आरती मंडळाच्या वतीने एका व्हाॅट्सॲप गृपच्या माध्यमातून दररोज शिवलिंगाची केलेल्या पुजेच्या दर्शनाचा लाभ देण्याचा प्रमाणिक उपक्रम राबविल्या जात आहे.
- ईश्वरदास तोष्णिवाल, अध्यक्ष, चाफेश्वर संस्थान, रिसोड
(संपादन - विवेक मेतकर)