तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवाशी असलेल्या राखोंडे दाम्प्त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ता.१ रोजी दुपारी १ ते २ वाजेदरम्यान घडली.
याबाबत सविस्तर असे की, सोनेवाडी येथील रहिवाशी संजय राजाराम राखोंडे यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार शांताराम देविदास राखोंडे (२२), आरती शांताराम राखोडे (१९) हे दोघे पती-पत्नी येवता येथील शिवारातील विष्णू बंगाळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन सोंगण्याकरिता गेले होते.
चिखली (जि.बुलडाणा) : तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवाशी असलेल्या राखोंडे दाम्प्त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ता.१ रोजी दुपारी १ ते २ वाजेदरम्यान घडली.
याबाबत सविस्तर असे की, सोनेवाडी येथील रहिवाशी संजय राजाराम राखोंडे यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार शांताराम देविदास राखोंडे (२२), आरती शांताराम राखोडे (१९) हे दोघे पती-पत्नी येवता येथील शिवारातील विष्णू बंगाळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन सोंगण्याकरिता गेले होते.
दुपारच्यावेळेस जेवण करीत असतांना विहिरीवर पाणी आणण्याकरिता गेलेली पत्नी आरती लवकर न आल्यामुळे विहिरीवर अचानक पाय घसरून पडलेली दिसताच पती शांताराम याने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
लॉकडाउनमध्ये दोघांचा विवाह झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय शिंदे करीत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)