
तालुक्यातील शेतकर्यांना रब्बीचे सिंचन करण्यासाठी २५ ते ३० नोव्हेंबर ह्या कालावधीत डावा व उजवा कालव्यातून पाणी सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते.
देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील शेतकर्यांना रब्बीचे सिंचन करण्यासाठी २५ ते ३० नोव्हेंबर ह्या कालावधीत डावा व उजवा कालव्यातून पाणी सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते.
त्यातच राजकीय पुढाऱ्यांनी नेहमीप्रमाणे श्रेय घेण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया गाजवले तरीही ठरलेल्या मुदतीत पाणी सुटले नाही दरम्यान दैनिक सकाळ ने प्रकाशित केलेल्या बातमीनंतर खडकपूर्णा प्रकल्प प्रशासनाने शेवटच्या दिवशी का होईना ता.३० सायंकाळी टप्पा क्रमांक एक आवर्तन सुरू केले आणि शेती सिंचनासाठी वाट पाहून असलेला शेतकरी समाधानी झाला.
तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खडकपूर्णा प्रकल्पातून सिंचनाकरिता डावा व उजवा कालव्या द्वारे पाणी सोडण्यात येते खडकपूर्णा प्रकल्पात यंदा पूर्णक्षमतेने जलसाठा झाला मात्र खडकपूर्णा व पाटबंधारे विभागात समन्वय नसल्याने नोव्हेंबर अखेर पर्यंतही पाण्याचे नियोजन नव्हते परिणामी कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही.
दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद सदस्य शीलाताई शिंपणे तसेच माजी आमदार डॉ. खेडेकर यांनी निवेदन देऊन कालीघात पाणी सोडण्याचे आवाहन केले आणि नेहमीप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला याविषयी प्रसिद्धीमाध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्या मात्र प्रसिद्धीस दिलेल्या कालावधी संपत आला असतानाही कालव्यामध्ये पाणी सुटले नाही.
याबाबत दैनिक सकाळ ने घोषणा होऊनही कालव्यात सुटले नाही पाणी अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली आणि प्रशासन खडबडून जागे झाले खडकपूर्णा प्रशासनाने सोमवारी सायंकाळी टप्पा क्रमांक एक आवर्तन सुरु केले कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने रब्बीच्या सिंचना करिता प्रतिक्षेत असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
टप्पा क्रमांक १ मध्ये १२०० लिटर पर सेकंद पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले असून उजवा आणि डाव्या कालव्यात हळूहळू टप्पा क्रमांक चार पर्यंत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प
(संपादन - विवेक मेतकर)