सायकल चालवून दिला मास्क वापरण्याचा संदेश

मनोज भिवगडे
Tuesday, 22 September 2020

शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना अकोलेकरांमध्ये मास्क वापरण्या संबंधी जनजागृती करण्याकरिता तसेच उत्तम आरोग्य ठेवण्याकरिता टोटल वेलनेस क्लब रामदास पेठ अकोला येथे ‘वोकल फॉर मास्क थीम सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.

अकोला :  शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना अकोलेकरांमध्ये मास्क वापरण्या संबंधी जनजागृती करण्याकरिता तसेच उत्तम आरोग्य ठेवण्याकरिता टोटल वेलनेस क्लब रामदास पेठ अकोला येथे ‘वोकल फॉर मास्क थीम सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.

आयएमएचे अध्यक्ष्य डॉ.कमलकिशोर लड्ढा यांनी झेंडी दाखवून उपक्रमाची सुरुवात केली. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे हा एक सक्षम उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः मास्क लावून स्पर्धकांनी ११ किलोमीटर सायकलचा प्रवास केला. रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाइन्स, गौरक्षण रोड येथे मास्क वापरण्याचा संदेश दिला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावेळी व्यापारी, नागरिक, व्यायाम करणारे व ऑटो चालक यांना मोफत मास्क वितरण करण्यात आले. यावेळी पोलिस, डॉक्टर व व्यापारी वर्ग या सर्व कोरोना वॉरियर्स सन्मान करण्यात आला. सर्व नागरिकांनी मास्क लावून कोरोनाशी लढण्यासाठी आपला सहभाग द्यावा व स्वतःलाही उत्तम निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करावा असा संदेश दिला.

यापुढेही समाज उपयोगी व आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येतील, असे टोटल वेलनेस क्लब संचालकांनी सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The message of using a mask while riding a bicycle