पुन्हा ‘मिनी लॉकडाउन’,  ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद

akola news Mini lockdown again, all essential services closed from today till April 30
akola news Mini lockdown again, all essential services closed from today till April 30

अकोला  ः कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने दिलेल्या सूचनेनुसार मंगळवार, ता. ५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत पुन्हा ‘मिनी लॉकडाउन’ लावण्यात आला आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी रात्री दिलेल्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहतील. शुक्रवारी रात्री ८ पासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण बंद राहणार आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या व अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सेवा बघता राज्यात आठवडा अखेरीस संपूर्ण लॉकडाउनचा आदेश राज्य शासनाने रविवारी दिला होता. दुसऱ्याच दिवशी जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात इतर सर्व प्रतिष्ठाने व सेवा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला. त्यानुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते रात्री आठ वाजेपर्यंत जमावबंदी राहील. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मुक्त फिरण्यास बंद राहील. अत्यावश्यक असेल त्यांनाच बाहेर पडण्यास मंजुरी असेल. शुक्रवारी रात्री ८ पासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
................
हे राहील सुरू
- सर्व खासगी व शासकी रुग्णालये, उपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने
- किराणा, भाजीपाला दुकाने, दुग्ध केंद्र, बेकरी, मिठाई व इतर खाद्यगृहे सुरू
- सार्वजनिक वाहतूक सेवा- रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा, बस सेवा
- स्थानिक प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी सर्व प्रकारची कामे
-मालवाहतूक, कृषिसंबंधी असलेल्या सर्व सेवा, दुकाने
- सर्व मान्यताप्राप्त प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, वृत्तपत्रसेवा
-सर्व प्रकारची वृत्तपत्रे यांना छपाई व वितरणाची परवानगी असेल
- पेट्रोल पंप सुरू राहतील, गॅस वितरण प्रणाली सुरू राहील

हे राहील बंद
- शाळा-महाविद्यालये बंद, दहावी, बारावीसाठी सुट
- सर्व प्रकारची खासगी कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र बंद राहतील
-अत्यावश्यक सेवेमधील दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, मार्केट, मॉल्स बंद राहतील
- जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद
- सर्व प्रकारची सार्वजनिक उद्याने, मैदाने
- सर्व प्रकारची सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षकगृहे बंद राहतील.
- हॉटेल्स, रेस्टॉरेंट, खाद्यगृहे यांना केवळे पार्सल व घरोपच सेवा देण्याकरिता सोमवारी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत परवानगी राहील. शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत केवळ घरपोच सेवा देता येईल.
- सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील.
- सर्व प्रकारची कटींगची दुकाने बंद राहतील.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com