
घराच्या अंगात खेळणारा तीन वर्षीय बालक बघता-बघता आईच्या डोळ्यापुढून गायब होतो...शोधाशोध सुरू होते...आईच्या जीवाची घालमेल सुरू...जीववर खाली होत असताना तब्बल २१ तासानंतर ‘त्या’ माऊलीचा जीव भांड्यात पडतो. सर्वच सुटकेचा निश्वास टाकतात. ही घटना आहे. लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील.
तीन वर्षांचा मुलगा हरवल्याने सुरू होती घालमेल; अपहरणाची चर्चा, तब्बल 21 तासानंतर आईचा जीव भांड्यात!
लोणार (जि.बुलडाणा) : घराच्या अंगात खेळणारा तीन वर्षीय बालक बघता-बघता आईच्या डोळ्यापुढून गायब होतो...शोधाशोध सुरू होते...आईच्या जीवाची घालमेल सुरू...जीववर खाली होत असताना तब्बल २१ तासानंतर ‘त्या’ माऊलीचा जीव भांड्यात पडतो. सर्वच सुटकेचा निश्वास टाकतात. ही घटना आहे. लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील.
पिंपळनेर येथील फकिरा दराडे यांचा ३ वर्षाचा मुलगा कार्तिक रविवारी घरा समोरील अंगणात खेळत असताना अचानक गायब झाला. त्याचा नातेवाईकानी सर्वत्र शोध घेतला. दिवस भर शोधाशोध सुरू होती. अखेर मुलाच्या हरवल्याची माहिती लोणार पोलिस स्टेशनला देण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक अजहर शेख यांच्यासह पोलिस ताफा तत्काळ घटना स्थळी रवाना केला. मुलगा हरवल्याची माहिती सर्व समाज माध्यमावर व्हायलर करण्यात आली. अखेर तब्ब्ल २१ तासांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी पिंपळनेर येथील ज्ञानेश्वर सानप यांच्या शेतात सानप यांचा मुलगा श्रीकांत सानप याला कार्तिक आढळून आला.
या बाबत ची माहिती सदर मुलाच्या नातेवाईकाना व लोणार पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्या मुलाला ग्रामीण रुग्णालय लोणार येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचाराकरीत मेहकर इथे रवाना केले. या बालकाची प्रकृती चांगली आहे.
अपहरणाची चर्चा
तीन वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र भीतीपोटी अपहरणकर्त्याने बालकास परत शेतात आणून सोडले, अशी पिंपळनेर ग्रामस्थ दबक्या आवाजात चर्चा करत आहे. हा बालक खरंच हरविला होता की, अज्ञात आरोपीने अपहरण केले याचा शोध घेणाचे आव्हान लोणार पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Web Title: Akola News Mother Was Frightened Loss Her Three Year Old Son Who Was Found 21 Hours
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..