
अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा मंगळवारी दुपारी महावितरणतर्फे खंडित करण्यात आल्यानंतर काही तासांतच तोंडघशी पडलेल्या महावितरणच्या अभियंत्यांनी रात्रीतूनच वीज पुरवठा पुन्हा सुरू केला. त्यामुळे अकोला शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले. नोव्हेंबर २०२० आणि जानेवारी-फेब्रुवारी २०२१ असे तीन महिन्याचे ७८ लाखांचे देयक थकीत असल्याने मंगळवारी दुपारी ४ वाजतानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. महान येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रासाठी घेण्यात आलेल्या वीज पुरवठ्याचे देयक मनपाने थकले होते. त्यासंदर्भात महावितरणकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर सव्वा कोटीचा भरणा नुकताच करण्यात आला होता. त्यानंतरही नोव्हेंबर २०२० आणि जानेवारी, फेब्रुवारी २०२१ असे तीन महिन्याचे देयक थकीत होते.
एकूण ७८ लाखांची रक्कम थकीत असल्याने मनपाला त्याचा भरणा करण्यासाठी ता. २३ मार्चपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्या वेळेत मनपाकडून महावितरणला धनादेश न मिळाल्याने महान येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज देयकाचे थकीत ७८ लाख रुपये भरण्यासाठी महानगरपालिका जलप्रदाय विभागातर्फे महावितरणतचे नावे धनादेश तयार करण्यात आला होता.
मात्र, मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मुंबईला असल्याने धनादेशावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. परिणामी महावितरणला तयार धनादेश वेळेत पोहोचता करणे शक्य झाले नाही. त्यानंतरही महावितरणच्या अभियंत्यांनी मनपा प्रशासनाचे ऐकून न घेता वीज पुरवठा खंडित केला. मात्र काही तासातच महावितरणचे अधिकारी तोंडघशी पडले व त्यांना महान येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा सुरळीत करावा लागला.
संपादन - विवेक मेतकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.